शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
3
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
4
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
5
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
6
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
7
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
8
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
9
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
10
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
11
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
12
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
13
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
14
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
15
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
16
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
17
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
18
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
19
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
20
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेवर बलात्कारप्रकरणी आरोपीस १० वर्षे सक्त मजुरीची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2019 18:39 IST

आरोपी विजय राजु गायकवाड याने बोराखेडी,  ता.मोताळा येथील अज्ञान बालिकेला लग्नाचे आमीष देवून पळवून नेले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क 
मलकापूर :  बोराखेडी येथील बालिकेवर तिला पळवून नेवून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी विजय राजु गायकवाड यास १० वर्षे सक्त मजुरी व दंड ठोठावण्यात आला आहे. मलकापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.एम. जाधव यांनी २३ सप्टेंबररोजी हा निकाल दिला. 
आरोपी विजय राजु गायकवाड याने बोराखेडी,  ता.मोताळा येथील अज्ञान बालिकेला लग्नाचे आमीष देवून पळवून नेले होते. याबाबत पिडीतेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून, आरोपी विरूध्द भादंविच कलम ३६३, ३६६, ३७६ तसेच बाल लैंगीक अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे कलमानुसार गुन्हा क्र.२०/१५ हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे तपासानंतर वि.न्यायालयामध्ये त्यावरून विशेष सत्र खटला क्र.१४/१५ हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता विवेक मा.बापट यांनी ११ साक्षीदार तपासले. या कामी न्यायालयीन पैरवी म्हणून राजेश भंडारी, एएसआय पोलीस स्टेशन बोराखेडी यांनी सहाय्य केले.
या प्रकरणात अंतिम युक्तीवाद पूर्ण होवून आज रोजी न्यायनिर्णय जाहीर करण्यात आला. त्यानुसार आरोपी विजय राजु गायकवाड यास भादंविचे कलम ३६३ नुसार ५ वर्षे सक्तमजुरी व दंड रक्कम रू.२ हजार, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद तसेच कलम ३६६ नुसार ७ वर्षे सक्त मजुरी व दंड रक्कम रू. २ हजार, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद तसेच भादंविचे कलम ३७६ नुसार १० वर्षे सक्त मजुरी व दंड रक्कम रू.२ हजार, दंड न भरल्यास एक महिन्याची साधी कैद तसेच पोस्को कायद्याचे कलम ४ नुसार १० वर्षे सक्तमजुरी व दंड रक्कम रू.२ हजार, दंड न भरल्यास एक महिना साधी कैद व दंडाची रक्कम पिडीत बालिकेला नुकसान भरपाई दाखल देण्यात यावी असा आदेश वि. जिल्हा व सत्र न्यायाधिश आर.एम. जाधव यांनी दिला. या प्रकरणात सहाय्यक सरकारी अभियोक्ता  म्हणून विवेक बापट यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

टॅग्स :MalkapurमलकापूरCourtन्यायालयRapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी