बँक दरोडा प्रकरणातील आरोपी गजाआड

By Admin | Updated: June 8, 2014 23:55 IST2014-06-08T23:54:54+5:302014-06-08T23:55:44+5:30

सुलतानपूर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत दरोडा टाकणार्‍या तीन आरोपींना मेहकर पोलीसांनी अटक केली.

Accused in bank robbery case | बँक दरोडा प्रकरणातील आरोपी गजाआड

बँक दरोडा प्रकरणातील आरोपी गजाआड

मेहकर : सुलतानपूर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेत दरोडा टाकणार्‍या तीन आरोपींना मेहकर पोलीसांनी ८ जून रोजी अटक केले आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा सुलतानपूर येथे ३१ मे रोजी रात्री तिजोरी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बँक मॅनेजर मनोजकुमार किशोरीराम यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला होता. पोलीस अधिक्षक श्यामराव दिघावकर व अप्पर पोलीस अधिक्षक श्‍वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हेशाखेच्या पोलिसांनी सदर गुन्ह्याच्या तपासात शोध घेण्यास सुरुवात केली. गुन्हा करण्याची पद्धती व वापरलेले साहित्य याची माहिती घेऊन आरोपींचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये आरोपी चंद्रसिंग नरसिंग खुर्दे रा.नायगाव ता.चिखली यास अटक करण्यात आली. चंद्रसिंग खुर्दे याने सदर गुन्ह्याची कबुली दिली व स्थागुशाच्या पथकाने ३१ मे रोजी जप्त केलेला देशी कट्टा व दोन जीवंत काडतूस सदर गुन्ह्याच्या वेळी वापरण्यात आल्याचे सांगितले. त्याने दिलेल्या गुन्ह्याच्या कबुलीवरुन सदर गुन्ह्यात सहभागी असलेले इतर आरोपी वाल्मीकी यमाजी माटे व यमाजी रामजी माटे रा.राहटगाव तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद यांना ताब्यात घेण्यात आले. या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले साहित्य, ६0 हजार रुपये किंमतीची हिरो कंपनीची मोटारसायकल, १ हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण ६१ हजार रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आला आहे.

Web Title: Accused in bank robbery case