वार्षिक सरासरीच्या ९ टक्के परतीचा पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 02:55 PM2019-10-29T14:55:34+5:302019-10-29T14:55:40+5:30

परतीच्या पावसामुळे जिल्ह्याची वार्षिक सरासरी ही जवळपास आठ टक्क्यांनी वाढली.

9 persent of annual average rainfall in Buldhana | वार्षिक सरासरीच्या ९ टक्के परतीचा पाऊस

वार्षिक सरासरीच्या ९ टक्के परतीचा पाऊस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: परतीच्या पावसाने यंदा जिल्ह्यात कहर केला असून वार्षिक सरासरीशी तुलना करता ९ टक्क्यां्या जवळपास हा पाऊस बरसला आहे. या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान केले असून शेतकऱ्याच्या हाताशी आलेल्या पिकाला मोठा फटका बसला आहे.
बुलडाणा जिल्ह्यात सरासरी ६६७.८ टक्के पाऊस पडतो. मात्र यंदा पावसाने वार्षिक सरासरी ओलांडली असून २८ आॅक्टोबर रोजी झालेल्या नोंदीनुसार ११३.४३ टक्के पाऊस बरसला आहे. दरम्यान, १९ आॅक्टोबर ते २८ आॅक्टोबर दरम्यान पडलेल्या पावसाचा विचार करता परतीच्या या पावसाने जिल्ह्यात सरासरी ५७.५७ मिमी पर्यंत हजेरी लावली. प्रामुख्याने सरासरी पाऊस कमी पडलेल्या देऊळगाव राजा, सिंदखे राजा तालुक्यात हा पाऊस दमदार बरसला आहे. त्यामुळे मात्र शेतात सोंगून ठेवलेले सोयाबीन, मूग, उडीद अशा पिकांचे मोठे नुकसान या पावसाने केले आहे.
सोंगून ठेवलेल्या धान्यालाच या पावसामुळे कोंब फुटले आहे. त्यामुळे गेली तीन वर्षे अवर्षणाचा फटका सहन करणाºया शेतकºयाला यंदा या अतिरिक्त पडलेल्या पावसामुळे झटका दिला आहे. त्यामुळे श्ोतकरी वर्ग आर्थिक दृष्ट्या अडचणीत आला आहे. पावसाळा संपल्यानंतर बुलडणा जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १०५.५२ टक्के पाऊस पडला होता. मात्र त्यानंतर आलेल्या या परतीच्या पावसामुळे जिल्ह्याची वार्षिक सरासरी ही जवळपास आठ टक्क्यांनी वाढली. यावरून प्रत्यक्ष शेतशिवारात किती पाऊस पडला आहे, याची कल्पना यावी.
 
२१ वर्षांनंतर दीपोत्सवात पाऊस
जिल्ह्यात तब्बल २१ वर्षांनंतर दीपोत्सवात परतीच्या पावसाने हजेरी लावलेली आहे. यापूर्वी १९९८ मध्ये असाच पाऊस बरसला होता. त्यावेळी एलनिनोच्या प्रभावामुले अगदी नोव्हेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात पाऊस बरसत होता. त्यावेळीही पिकांचे मोठे नुकसान झाले होते, असे जाणकार सांगतात. यंदाही तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: 9 persent of annual average rainfall in Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.