दुसरबीडमध्ये ६८ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:29 AM2021-01-17T04:29:28+5:302021-01-17T04:29:28+5:30

या ग्रामपंचायत निवडणुकीत दुसरबीड परिवर्तन पॅनल व दुसरबीड विकास आघाडीचे पॅनल आमनेसामने लढत आहेत. दुसरबीड परिवर्तन पॅनलचे वार्ड ...

68% turnout in Dusarbeed | दुसरबीडमध्ये ६८ टक्के मतदान

दुसरबीडमध्ये ६८ टक्के मतदान

googlenewsNext

या ग्रामपंचायत निवडणुकीत दुसरबीड परिवर्तन पॅनल व दुसरबीड विकास आघाडीचे पॅनल आमनेसामने लढत आहेत. दुसरबीड परिवर्तन पॅनलचे वार्ड क्र. ६ मधील एक उमेदवार अविरोध असल्याने दोन्ही पॅनलकडून १६-१६ उमेदवार रिंगणात आहेत, तर ३ उमेदवार अपक्ष असल्याने एकूण उमेदवारांची संख्या ३५ एवढी आहे. शुक्रवारी या उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद झाले आहे. एकूण ७ हजार २४३ मतदानापैकी ४ हजार ९३८ मतदान झाले आहे. येत्या १८ जानेवारी रोजी उमेदवारांचे भवितव्य ठरणार असून, या निवडणुकीत कोणाला यश मिळेल, याची जुळवाजुळव उमेदवार व निवडणुकीतील व्हाॅट्सॲप कार्यकर्ते राजकीय वर्तुळात सुरू आहे. अनेक दिव्यांगांनी मोठ्या चुरशीच्या निवडणुकीत आपल्या मतदानाचा अधिकार बजावला.

Web Title: 68% turnout in Dusarbeed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.