शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
18
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
19
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
20
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय

कोविड रुग्णालयात दातृत्वातून उभारली जातेय ५५ खाटांची गुढी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 11:46 AM

Covid Hospital Khamgaon : आता दातृत्वातूनच आणखी ५५ खाटांची गुढी रूग्णालयात उभारल्या जात आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात आणखी ४० बेड वाढविण्यात येत आहेत. कोरोना संकटावर मात करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच १५ खाटा वाढविण्यात आल्या. आता दातृत्वातूनच आणखी ५५ खाटांची गुढी रूग्णालयात उभारल्या जात आहे. त्यामुळे खामगाव आणि परिसरातील रूग्णांसह परिसरातील रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची ससेहोलपट थांबविण्यास मदत मिळणार आहे.बुलडाणा जिल्ह्यात कोरोना संसर्गाच संकट अधिक गडद होत आहे. वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या अनुषंगाने कोविड सेंटर आणि बेडस् वाढविण्यावर आरोग्य विभागाकडून भर देण्यात येत आहे. बुलडाणा जिल्हा प्रशासनाने गत आठवड्यात ४ कोविड सेंटरची वाढ केली आहे. अशातच खामगाव येथील ५० (खाटा) असलेल्या कोविड रूग्णालयात आणखी ४० खाटा वाढविण्यात येत आहेत. यामध्ये गत महिन्यातच १५ खाटा अतिरिक्त वाढविण्यात आल्या होत्या. आतापर्यंत तब्बल ५५ खाटा वाढविण्यात येत आल्याने खामगाव येथील कोविड रूग्णालयांची क्षमता १०५ खाटांवर पोहोचली आहे. परिणामी, घाटाखाली रूग्णांना खामगावातच उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

कोविड रूग्णालयाची क्षमता १०५ खाटांवर पोहोचणार!कोरोना विषाणू संक्रमण कालावधीत खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात कोविड रूग्णालयाच्या उभारणी, कोविड टेस्टींग लॅब निर्मिती आणि रूग्णालयाच्या ऑडीटसाठी तब्बल ५० लक्ष रुपयांची मदत खामगाव येथील एका दानशुराने केली. आता कोरोना उद्रेकाचा प्रकोप वाढता असतानाच, खामगाव कोविड रूग्णालयातील खाटा वाढविण्यासाठी याच दानशुराने आणखी मदतीचा हात पुढे केला आहे.

टॅग्स :khamgaonखामगावcorona virusकोरोना वायरस बातम्या