शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
2
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
3
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
4
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
5
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
6
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
7
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
8
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
9
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
10
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
11
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
12
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
13
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
14
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
15
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
16
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
17
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
18
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
19
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
20
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
Daily Top 2Weekly Top 5

२५८ जोडप्यांचे अनुदान रखडले

By admin | Updated: July 5, 2014 23:47 IST

राज्य शासनाने सुरू केलेल्या शुभमंगल सामुहिक विवाह योजनेला निधीच प्राप्त न झाल्यामुळे २५८ प्रस्ताव तसेच पडून आहेत.

बुलडाणा : शेतकरी व शेतमजूरांसह आर्थिक परिस्थिती कमकूवत असलेल्या कुटुंबावर मुलीच्या विवाहाचा आर्थिक बोजा पडू नये यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या शुभमंगल सामुहिक विवाह योजनेचा अशा परिवारांना मोठय़ा प्रमाणात लाभ मिळत असला तरी, मागील दोन वषार्ंपासून या योजनेला निधीच प्राप्त न झाल्यामुळे २५८ प्रस्ताव तसेच पडून आहेत.
जिल्हा महिला व बाल विकास विभागाला २0१३-१४ या आर्थिक वर्षात प्राप्त झालेल्या अर्जांपैकी अर्धे अर्ज अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत पडून आहेत. मागील वर्षी ११५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ५७ अर्ज अद्याप पडून असल्याने, ५७ वधू पिता या योजनेंतर्गत मिळणार्‍या १0 हजार रूपयांच्या अनुदानापासून वंचित आहेत.
गरीब शेतकरी व शेतमजूर किंवा आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या कुटुंबात मुलगी जन्मास येणे म्हणजे त्या आई-वडिलावर बोजा समजल्या जातो. अनेक आई वडिल तर मुलीच्या जन्मास शाप समजतात. अशा आईवडिलांना कर्जबाजारी होऊनच मुलीचे हात पिवळे करावे लागतात. ते कर्ज फेडण्यातच मग त्यांचे आयुष्य सरते.
या पार्श्‍वभूमीवर, मुलीचा जन्म हा शाप नसून, मुलगीसुद्धा एक वरदानच असल्याचे दाखवून देण्यासाठी व मुलीच्या लग्नासाठी वडिलांवर पडणारा आर्थिक बोजा कमी करण्यासाठी राज्य शासनाने २00८ मध्ये शुभमंगल सामूहिक विवाह योजना सुरू केली. पुढे २0११ मध्ये योजनेत काही सुधारणा करून सुधारीत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना सध्या राज्यात राबविली जात आहे. या योजनेंतर्गत दरवर्षी प्राप्त झालेले प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर, मागणीनुसार त्याच वर्षी अनुदानाचे वाटप व्हायला हवे; मात्र मागील चार वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यात या योजनेसाठी केवळ एकदाच निधी प्राप्त झाल्याचे समजते. सन २0१३-१४ मध्ये ३३ लाखांचा निधी प्राप्त झाला होता. ती रक्कम २0११-१२ आणि २0१२-१३ या वर्षातील प्रलंबीत असलेल्या प्रस्तावांसाठी खर्ची पडली.
आता २0१३-१४ या वर्षात प्राप्त झालेले २१५ आणि चालू वर्षातील ४३, असे एकूण २५८ प्रस्ताव मंजुर होऊन पडून आहेत. यासंदर्भात संबंधीत विभागाने प्रारंभी राज्य शासनाकडे ४३ लाख रुपयांच्या निधीची मागणी केली असून, पुन्हा पुरवणी मागणीही सादर केली आहे. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही निधीची तरतुद झालेली नाही. याची संबंधितांनी दखल घेवून निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.