शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

काळी-पिवळी अपघातात १९ जखमी

By admin | Updated: May 19, 2014 00:35 IST

मेहकरवरुन डोणगावकडे येत असलेल्या काळीपिवळीचा अपघात घडला. यामध्ये १९ प्रवाशी जखमी झाले आहे.

डोणगाव : मेहकरवरुन डोणगावकडे येत असलेल्या काळीपिवळीच्या चाकाचा रॉड तुटल्याने येथील वेअर हाऊसनजीक काळीपिवळीचा अपघात घडला. यामध्ये १९ प्रवाशी जखमी झाले आहे. सदर घटना १८ मे रोजी सकाळी ११.४५ वाजताच्या दरम्यान घडली. डोणगाव परिसरात क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी कोंबून वाहतूक जोमात सुरु असून, याकडे वाहतूक शाखेचे साफ दुर्लक्ष दिसून येत आहे. मेहकरवरुन एम.एच.२८ एच. ११२३ क्रमांकाची काळीपिवळी जीपगाडी डोणगावकडे प्रवाशी घेवून जात होती. स्थानिक वेअर हाऊसनजीक येताच काळीपिवळीच्या चाकाचा रॉड तुटला व गाडी रोडच्या बाजुने जावून उलटली. या अपघातात काळीपिवळीमधील तब्बल १९ प्रवाशी जखमी झाले आहेत. त्यामध्ये आंधृड येथील पंचफुला मधुकर टाकळकर, कावेरी ज्ञानेश्‍वर टाकळकर, गिता विठ्ठल टाकळकर, गोकुळ विठ्ठल टाकळकर व तीन वर्षीय गौरी टाकळकर हे प्रवाशी गंभीर जखमी झाले आहे. तसेच अंजनी बु. येथील सुमन टाकळकर, मेहकर येथील सचिन हरिभाऊ खोडके, ओम संतोष खोडके, गंगु संतोष खोडके, जया सचिन खोडके, अनिल गजानन करवते रा.भोसा, अश्‍विनी मोरे, वैदीका कंकाळ, शालीनी कंकाळ, प्रियंका मोरे, शिला मोरे रा.मेहकर यांच्यासह इतर तीन जण जखमी झाले आहे. जखमींवर डोणगाव येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले असून, इतर तीन जणांना मेहकर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात डोणगाव पोलीसांनी काळीपिवळी चालकाविरुद्ध कलम २७९, ३३७, ४२७ भादंवि सह कलम १८४ मोटर वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.