शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
2
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
4
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
5
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
6
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
7
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
8
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
9
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
10
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
11
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
12
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
13
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
14
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
15
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
16
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
17
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
18
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
19
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
20
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
Daily Top 2Weekly Top 5

११८ पोलिस पाटलांवर १८२ गावांचा ताण

By admin | Updated: May 17, 2014 23:02 IST

खामगाव व शेगाव तालुक्यात पोलिस पाटलांची तब्बल ६४ पदे रिक्त आहेत.

खामगाव: पोलिस यंत्रणा व महसूल विभागाचा ग्रामीण भागातील दुवा म्हणून काम पाहणार्‍या पोलिस पाटलांची खामगाव व शेगाव तालुक्यात तब्बल ६४ पदे रिक्त आहेत. रिक्त जागा असलेल्या गावांचे प्रभारी काम पाहताना या कार्यरत पोलिस पाटलांवर ताण पडत आहे. तर पोलिस पाटलांच्या रिक्त जागा भरतीबाबत शासनाने स्थगिती दिली आहे. ग्रामीण भागातील पारावर बसून ग्रामस्थांच्या तक्रारीचा न्यायनिवाडा करणार्‍या पोलिस पाटलांवर शासनाने अनेक कामे लादली आहे. गावातील किरकोळ वाद त्या ठिकाणीच मिटविण्यासाठी पोलिस पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरते. पूर्वीचा न्यायनिवाडा करणारा व गावात वेगळेच वलय असणारा पोलिस पाटील आता दुर्मीळ होऊ लागल्याची खंत व्यक्त होत आहे. अनेक शासकीय कामासाठी पोलिस पाटलाचे ओळखपत्र महत्त्वाचे ठरते. खामगाव उपविभागातील खामगाव व शेगाव तालुक्यात पोलिस पाटलांची १८२ पदे मंजूर आहेत. यापैकी ११८ ठिकाणी पोलिस पाटील कार्यरत आहेत, तर ६४ ठिकाणी अद्यापही ही पदे रिक्त आहेत. २0१२ मध्ये खामगाव उपविभागात पोलिस पाटलाची रिक्त पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू असताना राज्यात पडलेल्या दुष्काळ निवारणार्थ शासनाने काही योजना हाती घेतल्या होत्या. पोलिस पाटील भरती प्रक्रियेमुळे दुष्काळ निवारणार्थ काम करण्यामध्ये उपविभागीय अधिकारी यांना अडचणी येऊ नयेत व दुष्काळ निवारणार्थ पुरेसा वेळ मिळावा याकरिता सुरू असलेल्या पोलिस पाटील भरती प्रक्रियेस शासनाने पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती दिली होती; मात्र दीड वर्षाचा कालावधी उलटूनही पोलिस पाटलांच्या भरती प्रक्रियेबाबात शासनाने अद्यापही निर्णय घेतलेला नाही.