शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
6
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
7
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
8
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
9
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
10
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
11
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
12
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
13
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
14
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
15
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
16
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
17
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
18
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
19
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
20
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
Daily Top 2Weekly Top 5

१४१ गाव पाणीपुरवठा योजना फायद्याची

By admin | Updated: May 24, 2014 00:11 IST

जळगाव जामोद तालुक्यातील सुमारे २ हजार एकर शेतीही सिंचनाखाली येणार!

संग्रामपूर : सुमारे २ हजार एकर शेतीही सिंचनाखाली येणार संग्रामपूर: जळगाव जामोद मतदार संघात होऊ घातलेली १४१ गाव पाणीपुरवठा योजना दुहेरी फायद्याची ठरणार आहे. सदर योजना वान धरणावरुन पाणीपुरवठा करणार असल्याने जनतेच्या आरोग्याची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे. तर याच योजनेमुळे दोन हजार एकर बागायती क्षेत्र वाढणार आहे. खारपाणपट्याच्या या भागात क्षारयुक्त पाण्याने नागरिकांचे आरोग्य खराब होत असतांना बागायतीसाठी पाण्याची व्यवस्था नसल्याने रब्बीचेही उत्पादन घटलेले, त्यातच पोटाचे आजारामुळे दवाखान्याचा वाढता खर्च पाहता सर्वसामान्य कमालीचे त्रस्त होते. आरोग्यासाठी शुध्द पिण्याचे पाणी महत्वाचे असल्याने वान धरणाच्या जळगाव जा. शहर व १४0 गावांच्या या योजनेमुळे दीड वर्षानंतर गावागावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. पाणी उपलब्धतेनंतर सुरु असलेल्या स्थानिक पाणीपुरवठा योजनांसाठी दररोज होणारा उपसा बंद होईल व त्यातून जवळपास दोन हजार एकर क्षेत्र सिंचनाखाली येवू शकेल. या योजनेंतर्गत ४ लाख २५ हजार लोकांना दररोज ५0 लिटर प्रतिव्यक्ती प्रमाणे जवळपास दोन कोटी दहा लाख लिटर पाणी वान धरणातून मतदार संघातील नागरिकांना मिळणार आहे. ३६५ दिवसाचे हिशोबाने हा आकडा ७७५ कोटी एवढा होतो. म्हणजेच आजच्या घडीला गावागावात पाणीपुरवठा योजनांसाठी दररोजचा विविध साधनातून होणारा उपसा बंद होईल व त्यातून वर्षाचे ७७५ कोटी लिटर पाणी वाचवता येईल. कृषीच्या हिशेबाने प्रती एकराला वर्षभरात तीन पिकांसाठी ४0 लाख लिटर पाण्याची गरज असते. पिण्याच्या पाण्यासाठी होणारा उपसा बंद झाल्यास वाचलेले आठशे कोटी लिटरचे जवळपासचे पाणी शेती सिंचनासाठी कामी येईल.