शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

१४१ गाव पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

By admin | Updated: May 20, 2014 23:52 IST

वान धरण १४१ गाव पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईन टाकण्याला शुभारंभ करण्यात आला.

संग्रामपूर : खारपाणपट्टयातील जळगाव जा. आणि संग्रामपूर तालुक्यातील नागरिकांना शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी वान धरण १४१ गाव पाणीपुरवठा योजनेतील पाईपलाईन टाकण्याला शुभारंभ करण्यात आला. यासाठी २0 मे रोजी सोनाळा येथे छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आ.डॉ.संजय कुटे यांनी ही योजना म्हणजे मतदार संघातील जनतेचे विकासात्मक यश असल्याचे मत व्यक्त केले. या भागात क्षारयुक्त पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जात असल्याने गावागावात पोटाचे व किडनीचे आजार वाढल्याने मतदार संघातील जनता आरोग्याबाबत त्रस्त झाली आहे. यासाठी भूगर्भातून शुध्द पिण्याचे पाणी शक्य नसल्याने वान धरणाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी वेगळी योजना म्हणून आ.डॉ.संजय कुटे यांनी सर्वांच्या सहकार्यातून शासन दरबारी पाण्याचा मुद्दा प्रखरतेने मांडून शासनाच्या ही बाब लक्षात आणून दिली व त्यातून जळगाव जा. शहर व १४0 गाव पाणीपुरवठा योजना उदयास आली. या योजनेतील पाईपलाईन टाकण्याचा शुभारंभ ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला. यामध्येच पाण्याच्या टाकीचे बांधकाम उद्घाटनही करण्यात आले. या कार्यक्रमासाठी आमदारांसोबत सेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील, उपजिल्हा प्रमुख जानराव देशमुख, भाजपाचे राज्य परिषद सदस्य विजय भुतडा, नंदकिशोर अग्रवाल, सरपंचा शकुंतलाबाई गावंडे, जि.प. सदस्या नलिनीताई गावंडे, सभापती जिजाबाई प्रकाश धामोळे, कांचनबाई जयस्वाल, मिनाताई भास्कर, राजवंतीबाई विश्‍वकर्मा, भारत वाघ, जानराव गोरे, प्रमोद गोसावी, निलेश केसाळे, प्रमोद खोद्रे, रमेश खोवले, सोहमआप्पा वडशंकर, श्रीराम दाभाडे, नंदकिशोर विश्‍वकर्मा, रविंद्र दांडगे, मनोज अमानकर, जयराम इंगळे, अशोक मुरूख, श्याम आकोटकार, डॉ.शेख, संजय शिंगणापुरे, तुकाराम काळपांडे, प्रदीप सोळंके, राजेश गोटेचा, राजेश मुयांडे आदिंसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी आमदारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलतांना आमदारांनी सदर योजनेचे काम चांगल्या रितीने दज्रेदारपणे झाले पाहिजे व लवकरात लवकर जनतेपर्यंत पाणी पोहचले पाहिजे हाच प्रयत्न असणार आहे. मतदार संघाचा विकास करण्यासाठी सर्वसामान्यांचा विश्‍वास जिंकण्याचे काम प्रत्येक कार्यकर्त्याने करून चांगली माणसे जोडण्यासाठी पुढाकार घ्यावा. भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरूणाईचे मने जिंकल्याने मोठय़ा संख्येने यावेळी तरूणांमध्ये जागृती झाली व सत्ता परिवर्तन झाले. आता राज्यासाठीही कामाला लागण्याची वेळ आली आहे. या योजनेत सर्वच गावांचा समावेश आहे. हे सर्व जनतेच्या सहकार्यानेच झाले, असेही सांगितले. संचालन आणि आभार प्रदर्शन डॉ.शेख यांनी केले.