शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

धान वाचविण्यासाठी जि.प. पदाधिकारी सरसावले

By admin | Updated: August 21, 2016 00:34 IST

पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी असलेले धानपिक करपण्याच्या मार्गावर आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन : सिंचन प्रकल्पाचे पाणी सोडण्याची मागणी भंडारा : पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी असलेले धानपिक करपण्याच्या मार्गावर आहे. अनेक ठिकाणी रोवणी खोळंबली असून पाण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे टेकेपार व करचखेडा उपसा सिंचन योजनेतील पाणी सोडून धानपिक वाचवावे, अशी आर्त जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी केली आहे. याबबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याना निवेदन दिले आहे.भंडारा जिल्हा तसेच करचखेडा व टेकेपार उपसा सिंचन योजनेतील लाभ क्षेत्रातील मागील काही दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. निसर्गराजा कोपल्याने शेतकऱ्यांचे शेतातील धानपिके हातून जाण्याच्या मार्गावर आहे. या पिकांना पाण्याची गरज आहे. पाण्याअभावी शेतातील उभी पिके करपू लागली असून अनेक ठिकाणची रोवणी अडकलेली आहे. पावसाअभावी धान लागवड यावर्षी शक्य वाटत नसल्याने शेतकरी पुन्हा एकदा कर्जाच्या बोझ्याखाली दबण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दुष्काळामुळे शेतकरी नैराश्येत जावून विपरीत कृती करण्याची भिती व्यक्त होत आहे. करीता जिल्ह्यातील बंद असलेल्या टेकेपार व करचखेडा उपसा सिंचन योजना तात्काळ सुरू करून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती नरेश डहारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना निवेदनातून केली आहे. यावेळी सुनिल पडोळे उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य उत्तम कळपाते, ज्योती खवास, ईश्वर कळंबे, नरेश येवले, मनिषा वाघमारे, नाना बडगे, ताराचंद भुरे, सखाराम कारेमोरे, गजानन कळंबे, संजय अहिरकर आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)