शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

किरमटीत टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST

गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाच्या बोअरवेलची पाण्याची पातळी खालावली असताना जलकुंभातून गावकºयांना अल्प प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. यावर गावातील काही नागरीक नळांना टिल्लू पंप लावून अतिरिक्त पाणी ओढून घेत आहे. घरगुती वापरासाठी पाणी साठवण करीत असल्याने गावातील अन्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या कृञीम टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

ठळक मुद्देकृत्रिम पाणी टंचाई । शेतशिवारातून आणले जातेय पिण्याचे पाणी, टिल्लू पंपही जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील किरमटी येथे भारत निर्माण पाणीपुरवठा नळ योजनेअंतर्गत पिण्याच्या पुरवठा करणाऱ्या बोअरवेलची पाण्याची पातळी खालावली आहे. तर दुसरीकडे काही नागरिक टिल्लू पंपांचा वापर करीत असल्याने पाण्याची कृत्रीम टंचाई निर्माण झाली आहे. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी नागरीकच टँकरने शेतशिवारातुन पिण्याचे पाणी गावात वितरीत करीत आहे.जवळपास १२०० लोकसंख्या असलेल्या लाखांदूर तालुक्यातील किरमटी गावात मागील काही वर्षांपूर्वी लघु पाणीपुरवठा योजनेंतर्गत नळ योजना कार्यान्वीत तरण्यात आली होती. सबंधित योजनेंतर्गत गावातील नळ योजनेला मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याने पुढील काळात या गावात भारत निर्माण योजने अंतर्गत जलकुंभाचे बांधकाम करण्यात आले. सदर टाकीतील मागील अनेक वषार्पासुन नळ योजनेंतर्गत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असला तरी या जलकुंभात जुण्याच नळ योजनेच्या विद्युत पंपाद्वारे पाण्याची साठवण केली जात आहे.पाणीपुरवठा करणारे विद्युत पंप गावातीलच एका सार्वजनिक हातपंपावर बसविले असताना उन्हाळ्यात या हातपंपाची पाण्याची पातळी खालावली असल्याने पाण्याचा उपसाही कमी झालेला आहे. मागील काही वर्षापासून मोठे जलकुंभ असुनही गावकऱ्यांना पर्याप्त पिण्याचे पाणी ऊपलब्ध होत नाही, हीच खरी शोकांतिका आहे.गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विद्युत पंपाच्या बोअरवेलची पाण्याची पातळी खालावली असताना जलकुंभातून गावकºयांना अल्प प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. यावर गावातील काही नागरीक नळांना टिल्लू पंप लावून अतिरिक्त पाणी ओढून घेत आहे. घरगुती वापरासाठी पाणी साठवण करीत असल्याने गावातील अन्य नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या कृञीम टंचाईला सामोरे जावे लागत आहे.नागरिकांना शेतशिवारातुन टँकरद्वारे कृषीपंपाचे पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने गावात नव्याने एक बोअरवेल मंजुर केले आहे. मात्र लॉकडाऊनमुळे सबंधित बोअरवेलचे बांधकाम होऊ शकले नाही असेही सरपंचांनी सांगीतले. याप्रकरणी तात्काळ दखल घेऊन पाण्याची कृञीम टंचाई दुर करण्यासाठी मंजुर बोअरवेलचे बांधकाम तात्काळ सुरु करावे अशी मागणी गावकºयांनी केली आहे.तहान लागल्यावर...पाण्याची कृत्रिम किंवा नैसर्गीक टंचाई निर्माण झाल्यावरच उपाययोजना राबविली जाते. किंबहूना तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार आहे. दरवर्षीच पाणीटंचाईला तोंड देत असताना नियमित व कायमस्वरूपी उपाययोजनेकडे लक्ष देण्यात विलंब होत असतो. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो.टिल्लु पंपाद्वारे होणारी पाण्याची साठवण या गैरप्रकाराची माहिती येथील ग्रामपंचायत प्रशासनाला मिळाली. नळांना टिल्लू पंप लावून पाणी साठवण करणाऱ्या विरोधात कारवाई करताना गावातील काही नागरिकांनी टिल्लू पंप जप्त करण्यात आले.- सुनिता मेश्राम, सरपंच, किरमटी

टॅग्स :Waterपाणीwater scarcityपाणी टंचाई