शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
2
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
3
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
4
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
5
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
6
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
7
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
8
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
9
PM मोदींच्या आवाहनाला राकेश टिकैत यांचा पाठिंबा! सोन्याची खरेदी कशी होईल कमी? सुचवला 'जालीम उपाय'!
10
GT vs SRH : गुजरात टायटन्सचा विक्रमी विजय! सनरायझर्स हैदराबादला शंभरीच्या आत गुंडाळत अव्वलस्थानी झेप
11
हायटेक स्कॅनर अन् ३० मिनिटांत खेळ खल्लास! पेपरफुटीत नाशिकच्या विद्यार्थ्याचा हात; टक्कल करुन लपण्याचा प्रयत्न
12
१६ वर्षांच्या कारकिर्दीत ३१७ विकेट्स! तीन वर्षांपूर्वी घेतली निवृत्ती; आता ३७ व्या वर्षी टी-२० वर्ल्ड कपसाठी यू-टर्न
13
शरद पवारांच्या घरी अचानक भेट; बाहेर येऊन सुनील तटकरे म्हणाले, "मी गेले काही दिवस..."
14
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
15
LPG संकटात ग्राहकांना आणखी एक मोठा झटका! आता आपोआप बंद होणार 'या' लोकांची गॅस सबसिडी
16
अर्धशतकी खेळीसह साई सुदर्शनचा मोठा पराक्रम! हार्दिक पांड्याला मागे टाकत गिलच्या विक्रमाशी बरोबरी
17
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
18
GT vs SRH : ७ चेंडूत २ विकेट्स! पॉवर प्लेमध्ये विदर्भकर प्रफुल हिंगेची हवा; अंपायरला निर्णय बदलावा लागला (VIDEO)
19
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
20
मुंबईत डॉकयार्ड रोडवर अज्ञातांकडून फायरिंग; एक जखमी, मागून झाडल्या दोन गोळ्या
Daily Top 2Weekly Top 5

सालेबर्डी पुनर्वसन अतिक्रमणाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 05:00 IST

सालेबर्डी (पांधी) चे नवीन पुनर्वसन पर्यायी गावठाण शहापूर (मारेगांव) या ठिकाणी सदर प्रकल्पग्रस्तांना भूखंड व पट्टे देण्यात आले आहे. सदर ठिकाणी प्रकल्पग्रस्ताच्या मिळालेल्या भूखंडावर बळजबरीने अतिक्रमण करुन, प्रकल्पग्रस्तांच्या भूखंडावर डल्ला मारण्याचे काम सदर ठिकाणी दिसून येत आहे. मात्र विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. त्याचप्रमाणे सालेबर्डी पुनर्वसनाला लागनूच पिपरी पुनर्वसन आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : गत दोन वर्षापासून सालेबर्डी पुनर्वसन अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. याबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार लेखी माहिती देऊ नही या गावाकडे गोसेखुर्द विभाग व संबंधित यंत्रणा कानाडोळा करीत असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यात हरीतक्रांती घडावी म्हणून शासनाने गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प साकारला. या प्रकल्पाअंतर्गत हजारो नागरिक बेघर झाले. प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आजही शासन-प्रशासन दरबारी धुळखात परिस्थितीमध्ये आहेत. भंडारा तालुक्यातील सालेबर्डी (पांधी) हे गाव गोसेखुर्द प्रकल्पात संपादित करुन या गावाचे नियोजित पुनर्वसन पर्यायी गावठाण शहापूर (मारेगांव) या ठिकाणी आहे. पुनर्वसन नागरी सुविधेची कामे अंतिम टप्प्यात असून, प्रत्यक्ष ताबा मिळणे बाकी आहे.
सालेबर्डी (पांधी) चे नवीन पुनर्वसन पर्यायी गावठाण शहापूर (मारेगांव) या ठिकाणी सदर प्रकल्पग्रस्तांना भूखंड व पट्टे देण्यात आले आहे. सदर ठिकाणी प्रकल्पग्रस्ताच्या मिळालेल्या भूखंडावर बळजबरीने अतिक्रमण करुन, प्रकल्पग्रस्तांच्या भूखंडावर डल्ला मारण्याचे काम सदर ठिकाणी दिसून येत आहे. मात्र विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. त्याचप्रमाणे सालेबर्डी पुनर्वसनाला लागनूच पिपरी पुनर्वसन आहे.
पिपरी पुनर्वसन गावातील प्रकल्पग्रस्तांनी सदर प्रकल्पग्रस्तांना मिळालेल्या भूखंडावर बळजबरीने शौचालय व पक्के इमारतीचे बांधकाम करण्यात आले. यासंबधी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी दोन वर्षापासून गोसेखुर्द विभाग व संबंधित यंत्रणेकडे लेखी माहिती देवून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप प्रकल्पग्रस्तांनी केला. या प्रकारामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये असंतोष खदखदत आहे.

विदर्भ पाटबंधारे विकास मंडळाचे दुर्लक्ष
पुनर्वसन पर्यायी गावठाण शहापूर या ठिकाणी बळजबरीने बाहेरच्या व्यक्तींनी अतिक्रमण केल्यामुळे गत दोन वर्षापासून ग्रामपंचायतने गोसेखुर्द विभागाकडे लेखी निवेदन दिले होते. मात्र या गंभीर समस्येकडे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे दुर्लक्ष दिसून येत आहे.