शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

लस आली, पण लसीकरणाचे सर्व्हर डाऊन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:33 IST

गोंदिया : जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून कोरोना लसींचा साठा संपल्याने लसीकरण पूर्णपणे ठप्प झाले होते. त्यानंतर शुक्रवारी (दि.९) ९,९२० ...

गोंदिया : जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून कोरोना लसींचा साठा संपल्याने लसीकरण पूर्णपणे ठप्प झाले होते. त्यानंतर शुक्रवारी (दि.९) ९,९२० कोव्हॅक्सिन लसींचे डोस प्राप्त झाले. डोसचे सर्व १४० केंद्रांना वितरण करण्यात आले. पण शनिवारी लसीकरणाचे सर्व्हर सकाळपासूनच डाऊन असल्याने लसीकरणाची प्रक्रिया ठप्प होती.

संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना लसींचा तुटवडा निर्माण झाला होता. त्यामुळे याचा कोविड लसीकरणावर परिणाम झाला होता. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख आठ हजार नागरिकांना कोविड लसीकरण करण्यात आले, तर अजून ३ लाख १५ हजार नागरिकांना लसीकरण होणे शिल्लक आहे. यासाठी ३ लाख १८ हजार लसींची गरज आहे. जिल्हा आरोग्य विभागाने शासनाकडे लसींची मागणी केली. मंगळवारी जिल्ह्यातील लसींचा साठा पूर्ण संपल्याने बुधवारपासून लसीकरण माेहीम पूर्णपणे ठप्प झाली होती. शुक्रवारी जिल्ह्याला काही प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध होईल अशी शक्यता होती. पण केवळ ९,९२० कोव्हॅक्सिन लसींचा साठा उपलब्ध झाला. हा साठा जिल्ह्यातील सर्व १४० लसीकरण केंद्रांना वितरित करण्यात आला. पण शनिवारी सकाळपासून लसीकरणाचे सर्व्हर डाऊन असल्याने नोंदणी होत नव्हती. त्यामुळे दुपारी २ वाजतापर्यंत लसीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प होती. सर्व्हर डाऊनची समस्या केवळ गोंदिया जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली होती, असे आरोग्य विभागाच्या सूृत्रांनी सांगितले. जिल्ह्यात दररोज दहा हजारावर नागरिकांना लसीकरण केले जाते. त्यामुळे प्राप्त झालेल्या ९,९२० डोस साठा किती दिवस पुरेल याबाबत शंका आहे, तर केवळ कोव्हॅक्सिनचे डोस प्राप्त झाल्याने काेविशिल्डचा साठा केव्हापर्यंत मिळेल, याबाबत अद्यापही अनिश्चितता आहे.

लसीकरण मोहिमेला ब्रेक लागल्याने चिंतेत वाढ

जिल्ह्यात दररोज ५०० हून अधिक कोरोना बाधितांची भर पडत आहे. रुग्णसंख्येचा आकडा दररोज फुगत आहे. अशात कोरोना लसीकरण हे प्रभावी समजले जात होते. पण लसींचा पुरवठा होत नसल्याने लसीकरण मोहिमदेखील ठप्प झाली आहे. त्यामुळे लसीकरणाला घेऊन नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.