शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात एकाच दिवशी विक्रमी 23 हजार नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2021 05:00 IST

जिल्ह्यात आतापर्यंत सात लाख ७२ हजार ६४३ नागरिकांनी लसीचा पहिला डाेस, तर तीन लाख ७ हजार ७१६ नागरिकांनी लसीचा दुसरा डाेस घेतला आहे. गुरुवारी जिल्हाभर विशेष लसीकरण अभियान राबविण्यात आले. या अभियानात आठ हजार ९८२ लाभार्थ्यांनी पहिला डाेस, तर १३ हजार २०५ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डाेस घेतला आहे. यासाठी आराेग्य विभाग, आशा, अंगणवाडी सेविका, तलाठी, शिक्षक, ग्रामसेवक व सरपंचांनी सहकार्य केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : काेराेना संसर्गाची तिसरी लाट टाळण्यासाठी जिल्ह्यात लसीकरणाला गती आली असून गुरुवारी एकाच दिवशी विक्रमी २२ हजार ९७ नागरिकांनी लस घेतली. जिल्ह्यात ८६ टक्के नागरिकांनी लसीचा पहिला डाेस घेतला असून लसीकरणात भंडारा जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. आता रविवारी जिल्ह्यातील २२५ केंद्रांवर विशेष अभियान राबविण्यात येत असून १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सात लाख ७२ हजार ६४३ नागरिकांनी लसीचा पहिला डाेस, तर तीन लाख ७ हजार ७१६ नागरिकांनी लसीचा दुसरा डाेस घेतला आहे. गुरुवारी जिल्हाभर विशेष लसीकरण अभियान राबविण्यात आले. या अभियानात आठ हजार ९८२ लाभार्थ्यांनी पहिला डाेस, तर १३ हजार २०५ लाभार्थ्यांनी लसीचा दुसरा डाेस घेतला आहे. यासाठी आराेग्य विभाग, आशा, अंगणवाडी सेविका, तलाठी, शिक्षक, ग्रामसेवक व सरपंचांनी सहकार्य केले आहे.जिल्ह्यात पहिला डाेस घेणाऱ्यांची संख्या ८६ टक्के असली तरी, पात्र हाेऊनही दुसरा डाेस न घेणाऱ्यांची संख्या जवळपास ३८ टक्के आहे. अशा नागरिकांनी जवळच्या केंद्रावर जाऊन दुसरा डाेस घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे. त्याचप्रमाणे सहव्याधी असलेल्या व्यक्तींनी सुध्दा प्राधान्याने लस घ्यावी. सहव्याधी असणारे व्यक्ती लस घेण्यासाठी पुढे येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. आता रविवारी २२५ ठिकाणी लसीकरण अभियान राबविले जाणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांकडून यंत्रणेचे काैतुक- विक्रमी लसीकरण करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी शुक्रवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत काैतुक केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश पाटील, उपजिल्हाधिकारी अर्चना यादव, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. रियाज फारुखी, जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. प्रशांत उईके, जिल्हा लसीकरण अधिकारी माधुरी माथुरकर उपस्थित हाेते. लसीकरणात सहभाग नाेंदविणाऱ्या सर्वांचे यावेळी काैतुक करण्यात आले. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस