शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

मराठीचा वापर करून ‘मायबोली’ जपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2017 00:32 IST

आधुनिकतेत आता प्रत्येक कार्यालयात इंग्रजीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे.

चरण वाघमारे यांचे प्रतिपादन : भंडारा बसस्थानकात मराठी भाषा गौरव दिनभंडारा : आधुनिकतेत आता प्रत्येक कार्यालयात इंग्रजीचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. ही चांगली बाब असली तरी प्रत्येक मराठी माणसाने इंग्रजी सोबतच मराठी भाषाही जपली पाहिजे. आवश्यक तिथेच प्रत्येकाने इंग्रजीचा वापर करावा. मराठीचा वापर प्रत्येक ठिकाणी करून ‘मायबोली’ जपावी, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले. मराठी भाषा दिन कार्यक्रमाचे आयोजन भंडारा मध्यवर्ती बसस्थानकावर करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला विभागीय नियंत्रक नागुलवार, जे.एम. पटेल महाविद्यालयाच्या मराठी विषयाच्या प्राध्यापिका आरती देशपांडे, कामगार अधिकारी गोन्नाडे, राज्य परिवहन महामंडळाचे भंडारा आगार व्यवस्थापक संजय डफरे, वाहतूक निरीक्षक बसस्थानक प्रमुख सुनिल जिभकाटे, विभागीय सांख्यीकी अधिकारी आदमने, सहवाहतूक निरीक्षक आर.जे. गडेकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मराठी साहित्याचा मापदंड जपण्यासाठी राज्यभर मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्याचे निर्देश राज्य मार्ग परिवह न महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्या अनुषंगाने सोमवारला भंडारा येथील मध्यवर्ती बसस्थानकावर मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मराठी भाषेची प्रत्येकाने स्वत:पासून सुरुवात करून आपल्या बोलण्यातून, वागण्यातून, व्यवहारातून मराठी भाषा वापरली पाहिजे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भंडारा आगार व्यवस्थापक संजय डफरे यांनी केले. संचालन व आभार बसस्थानक प्रमुख सुनिल जिभकाटे यांनी केले. कार्यक्रमाला लेखापाल वाघाये, अनिल पशिने, अल्पेश पशिने, आगारातील चालक व वाहक यांच्यासह बसस्थानकातील कर्मचारी व प्रवासी उपस्थित होते. दरम्यान मराठी भाषादिनाचे औचित्य साधून बसस्थानकात भव्य रांगोळी काढण्यात आली. या रांगोळीतून मराठी भाषेचे महत्व सांगण्यात आले. ही रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. (शहर प्रतिनिधी)