शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा जिल्ह्याला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:06 IST

जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. रात्री ९ वाजताच्या सुमारास अचानक आकाश ढगांनी भरून आले. वाराही वेगाने वाहू ...

जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासूनच वातावरणात बदल जाणवत होता. रात्री ९ वाजताच्या सुमारास अचानक आकाश ढगांनी भरून आले. वाराही वेगाने वाहू लागला. रात्री १०.३० वाजताच्या सुमारास जिल्ह्याच्या काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. साधारणत: १५ मिनिटे झालेल्या या पावसाने रब्बी पिकांचे नुकसान झाले. आंब्याचा मोहोर गळून पडला. गहू, हरभरा, उडीद, मूग, लाखोरी आदी पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास भंडारा शहरात अर्धा तास चांगलाच पाऊस बरसला.

भंडारा शहरालगत असलेल्या कारधा येथील हवामान विभागाच्या माहितीनुसार, शहरात सकाळी तापमान २४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. मंगळवारच्या तुलनेत दोन अंश घट नोंदविण्यात आली. जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळी पाऊस झाला असून या पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख अभिषेक नामदास यांनी दिली.

जिल्ह्यात आधारभूत खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात धान उघड्यावर असून या अवकाळी पावसाने धानाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अनेक शेतकरी धान झाकण्यासाठी ताडपत्रीची शोधाशोध करीत असल्याचे चित्र होते.

बॉक्स

तुमसर-मोहाडी तालुक्यात नुकसान

तुमसर तालुक्यात मंगळवारी रात्री आणि बुधवारी सकाळी अवकाळी पाऊस झाला. यामुळे जनजीवन प्रभावित झाले. तालुक्यातील ग्रामीण भागात या पावसाचा मोठा फटका सहन करावा लागला. पवनारा येथे गहू पिकाचे मोठे नुकसान झाले. दिवसभर वातावरणात गारवा होता. मोहाडी तालुक्यातील लोहारा, जांब, कांद्री परिसरासह इतर भागात पाऊस झाला.