काँग्रेसतर्फे असंघटित कामगारांचा मेळावा

By Admin | Updated: May 2, 2017 00:53 IST2017-05-02T00:53:43+5:302017-05-02T00:53:43+5:30

कामगार दिनानिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटी असंघटीत कामगार सेलच्या वतीने असंघटित कामगार व कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला.

Unorganized workers meet by Congress | काँग्रेसतर्फे असंघटित कामगारांचा मेळावा

काँग्रेसतर्फे असंघटित कामगारांचा मेळावा

भंडारा : कामगार दिनानिमित्त जिल्हा काँग्रेस कमिटी असंघटीत कामगार सेलच्या वतीने असंघटित कामगार व कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला. मेळाव्याचे उद्घाटन भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रेमसागर गणविर यांचे अध्यक्षतेखाली मधुकर लिचडे यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी राजकपूर राऊत, सचिन घनमारे, प्रकाश भोगे उपस्थित होते. मधुकर लिचडे म्हणाले की, आजच्या यांत्रिक युगात असंघटीत कामगार असुरक्षित आहेत. त्यांच्या हक्कासाठी व संरक्षणासाठी जिल्ह्यातील असंघटीत कामगार सेलनी सदैव तत्पर राहून त्यांना न्याय मिळवून द्यावा. प्रेमसागर गणविर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष मार्र्कं डराव भेंडारकर यांनी केले तथा आभार माधोराव भोयर यांनी केले. कार्यक्रमाला सचिन काले, प्रकाश दुर्गे, अकूश मुंजे, विवेक गायधने, महेश शहारे, अविनाश राऊत, सचिन घनमारे, जनार्धन निंबार्ते, शर्मिल बोदेले, बाळकृष्ण हटनागड, नरेश बेलेकर, चुन्नीलाल वासनिक, संघमित्रा राऊत, ज्याती राऊत, अंकूश वंजारी, संजय वैद्ये, दिनेश चोले, प्रकाश भोजे, रामु अंबादे, मंगला भेंडारकर, रंजना मेश्राम, सरिता मेश्राम, विवेक भोयर व कार्यकर्ते उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Unorganized workers meet by Congress