शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

हौशी नागरिकांना पोलिसी खाक्या दाखवत समज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 05:00 IST

भंडारा शहरात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. मात्र संपूर्ण राज्यात खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात असल्याने त्याचे आदेश भंडारा शहरातही लागू झाले आहेत. सोमवारी रात्री ९ वाजतापासून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र अनेक हौशी नागरिक सकाळपासून रस्त्यावर दिसू लागले होते.

ठळक मुद्देकोरोना प्रतिबंधक उपाय : संचारबंदी असतानाही जिल्ह्यातील अनेक शहरात रस्त्यांवर धाव

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, गर्दी करू नये. असे आवाहन करीत भंडारा शहरासह जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र काही हौशी नागरिक ही संचारबंदी कशी आहे हे पाहण्यासाठी रस्त्यावर येत आहेत. अशा बेजबाबदार हौशी नागरिकांना मंगळवारी चौकाचौकांत पोलीसी खाक्या दाखवत कडक शब्दात समज दिली. त्यानंतर दुपारी रस्ते निर्मनुष्य झाले.
भंडारा शहरात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. मात्र संपूर्ण राज्यात खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात असल्याने त्याचे आदेश भंडारा शहरातही लागू झाले आहेत. सोमवारी रात्री ९ वाजतापासून जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व आस्थापना बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र अनेक हौशी नागरिक सकाळपासून रस्त्यावर दिसू लागले होते. मंगळवारी सकाळी शहरातील चौकांमध्ये काही तरुण गप्पा मारत असल्याचे चित्र दिसत होते. सकाळी १० वाजेपर्यंत शहरातील विविध भागात मोटारसायकलीही फिरताना दिसत होत्या. संचारबंदी असतानाही नागरिक रस्त्यावर येऊन एन्जॉय करण्याचा प्रयत्न करीत होते.
हा प्रकार रोखण्यासाठी अखेर पोलीस रस्त्यावर उतरले. पोलिसांच्या वाहनातील ध्वनी क्षेपकावरून प्रथम सूचना देण्यात आल्या. मात्र त्यानंतरही कुणी ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नव्हते.
शेवटी कडक शब्दात आणि लाठी उगारून पोलिसांनी नागरिकांना थेट घरात बसा नाहीतर लॉकअपमध्ये जाल असा सज्जड दम दिला. याचा परिणाम अवघ्या काही तासातच शहरात दिसून आला. शहरातील रस्त्यावरील गर्दी ओसरली. केवळ किराणा दुकान, औषधी विक्रेते आणि भाजीपाल्यांची दुकाने तेवढी रस्त्यावर दिसत होती.

चौकाचौकात बॅरिकेटस्
भंडारा शहरात येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. शहरातून जाणारा केवळ राष्ट्रीय महामार्ग तेवढा सुरळीत आहे. मात्र त्यावरही वाहनांची संख्या अगदी रोडावल्यासारखी दिसत आहे. शहरातील विविध भागात पोलिसांनी मंगळवारी रात्रीपासूनच बॅरिकेटस् लावल्या आहेत. राजीव गांधी चौक, खामतलाव चौक, गांधी चौक, मुस्लिम लायब्ररी चौक, शीतलामाता मंदिर परिसरात वाहतूक रोखून धरण्यात आली होती. प्रत्येकाची पोलीस विचारपूस करूनच पुढे सोडत होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या