शेतीच्या वादात काकाने केला पुतण्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:37 IST2021-05-08T04:37:53+5:302021-05-08T04:37:53+5:30

रवींद्र श्यामराव सव्वालाखे (३८) रा. रामपूर असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी शोभेलाल उपासू सव्वालाखे (५७), शिवा उपासू सव्वालाखे ...

Uncle kills nephew in farming dispute | शेतीच्या वादात काकाने केला पुतण्याचा खून

शेतीच्या वादात काकाने केला पुतण्याचा खून

रवींद्र श्यामराव सव्वालाखे (३८) रा. रामपूर असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी शोभेलाल उपासू सव्वालाखे (५७), शिवा उपासू सव्वालाखे (५५), बाबुलाल उपासू सव्वालाखे (५३), गेंदलाल जलकन सव्वालाखे (३८), दुर्गाप्रसाद शिवा सव्वालाखे (२३), बळीराम बाबुलाल सव्वालाखे (२१), विनोद जलकन सव्वालाखे (३५) सर्व रा. रामपूर (मांढेसर), अशी आरोपींची नावे आहेत. मांढेसर येथील सव्वालाखे कुटुंबात शेतीची हिस्सेवाटणी काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. परंतु झालेल्या वाटणीवरून कुटुंबात धुसफूस सुरू होती. त्यातच जागेचा वाद सुरू होता. शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता रवींद्र सव्वालाखे आपल्या शेतात गेला होता. त्यावेळी याच कारणावरून वाद झाला. या वादात सात जण हातात लाठ्याकाठ्या घेऊन आले. त्यांनी रवींद्रच्या डोक्यावर काठीने जोरदार प्रहार केला. त्यात तो जागीच गतप्राण झाला. भांडणाचा आवाज ऐकून रवींद्रचा लहान भाऊ देवेंद्र धावत आला. त्यावेळी त्याच्या मागेही हातात काठ्या व तलवार घेऊन मारायला धावले. त्यात तो किरकोळ जखमी झाला. जीव वाचवून तेथून पळून गेला.

या घटनेची माहिती गावात होताच एकच खळबळ उडाली. अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची माहिती मोहाडी पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार राहुल देशपांडे, सहायक फौजदार राजेंद्र गायकवाड, पोलीस हवालदार सोमेश्वर सेलोकर, मिथून चांदेवार, पवन राऊत, दुर्योधन भुरे, सागर भांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. देवेंद्र सव्वालाखे याच्या तक्रारीवरून पोलिसांनी भादंवि ३०२, ३२४, १४७, १४८, १४९, महाराष्ट्र पोलीस कायदा १३५, भारतीय हत्यार कायदा कलम चार, २५ नुसार गुन्हा दाखल केला. अवघ्या काही तासातच सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली.

Web Title: Uncle kills nephew in farming dispute