निर्माणाधीन पुलात दुचाकी कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:35 IST2021-03-10T04:35:24+5:302021-03-10T04:35:24+5:30

भंडारा : भरधाव दुचाकी निर्माणाधीन पुलात कोसळून झालेल्या अपघातात एक तरुण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही ...

The two-wheeler crashed into a bridge under construction | निर्माणाधीन पुलात दुचाकी कोसळली

निर्माणाधीन पुलात दुचाकी कोसळली

भंडारा : भरधाव दुचाकी निर्माणाधीन पुलात कोसळून झालेल्या अपघातात एक तरुण ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना पवनी तालुक्यातील बेटाळा ते निलज मार्गावर सोमवारी सकाळी उघडकीस आली.

सुनील रंगलाल बावनकर (२९) रा.शिवनाळा ता.पवनी असे मृताचे नाव आहे, तर दिवाकर उर्फ मच्छिंद्र दिगांबर देशमुख (२८) रा.शिवनाळा असे जखमीचे नाव आहे. सुनील आणि दिवाकर दुचाकी क्रमांक एमएच ३६ एएच ५२५५ ने पवनीकडून निलजकडे बेटाळा मार्गे जात होते. बेटाळाजवळ निर्माणाधीन पूल दिसला नाही. त्यामुळे सरळ दुचाकी निर्माणाधीन पुलात जाऊन कोसळली. त्यात सुनील बावनकर जागीच ठार झाला, तर दिवाकर गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती होताच गावकऱ्यांनी धाव घेऊन जखमीला रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पवनी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: The two-wheeler crashed into a bridge under construction