शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

रोजी गेली तरी दोन लक्ष ३१ हजार कुटुंबांना मिळणार रोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:33 IST

भंडारा : पुन्हा दुसऱ्यांदा पंधरा दिवसांचा लाॅकडाऊन राज्य शासनाने घोषित केला आहे. या काळात गरीब, गरजू व लाभार्थ्यांची मोठी ...

भंडारा : पुन्हा दुसऱ्यांदा पंधरा दिवसांचा लाॅकडाऊन राज्य शासनाने घोषित केला आहे. या काळात गरीब, गरजू व लाभार्थ्यांची मोठी कुचंबणा होते. अशा स्थितीत कुठलाही लाभार्थी अन्नधान्याशिवाय राहू नये, यासाठी राज्य शासनाने एक महिना नि:शुल्क धान्य वितरणाची घोषणा केली आहे. त्या अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील दोन लक्ष ३१ हजार १८ शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण केले जाणार आहे.

कोरोना महामारीच्या रूपाने अनेक देशांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. त्यात कित्येक गरीब कुटुंबे भरडली गेली आहेत. अशा कुटुंबांना लाॅकडाऊन काळात किमान रोजी नव्हे, तर किमान रोटी तरी उपलब्ध व्हावी, या हेतूने राज्य सरकारने नि:शुल्क धान्य देण्याचा निर्णय घेतला. सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत सदर धान्य दिले जाणार आहे. भंडारा जिल्ह्यात एकूण दोन लाख ५७ हजार ६१२ शिधापत्रिका धारक आहेत. यात दारिद्र्यरेषेखालील कार्डधारकांची संख्या दोन लाख ३१ हजार १८ इतकी असून, त्यात सात लाख ३८ हजार ९८३ युनिटधारक आहेत.

बॉक्स

लाभार्थ्यांना मिळणार गहू आणि तांदूळ

राज्य शासनाने घोषणा केल्याप्रमाणे लॉकडाऊन काळात दारिद्र्यरेषेखालील शिधापत्रिकाधारकांना तांदूळ आणि गहू देण्यात येणार आहे. यात अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना येत्या एक महिन्यासाठी प्रती व्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत देण्यात येणार आहे. रेशन कार्ड असलेल्या आणि नसलेल्या व्यक्तींना देखील त्याचा लाभ दिला जाणार आहे.

कोट बॉक्स

लॉकडाऊनमुळे रोजगारावर परिणाम जाणवतो. राज्य शासनाने घोषणा केली असली तरी वेळेवर धान्य उपलब्ध झाले पाहिजे. आधीच महागाईने कंबरडे मोडले आहे.

-अश्विन साखरे, भंडारा

अन्नधान्य मिळत असले तरी लाॅकडाऊन नकोच. काही नागरिक नियमांचे पालन करीत नाहीत. अशा स्थितीत कठोर पावले उचलली जातात. याचा भुर्दंड गरिबांनाच सहन करावा लागतो.

-अनिल वासनिक, खुटसावर

अन्नधान्यासोबतच अन्य मदत मिळायला हवी. १५ दिवसांनी रोजगार परत मिळणार का याची हमी दिसून येत नाही. रोज कमविणे व खाणे अशी परिस्थिती आहे.

- ईश्वर भिवगडे, पिंपळगाव