जिल्ह्यात शनिवारी आढळले दोन कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2020 05:00 AM2020-05-17T05:00:00+5:302020-05-17T05:01:05+5:30

जिल्हा प्रशासनाने सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास जिल्ह्यात नव्याने दोन कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळल्याचे जाहीर केले. हे दोन्ही व्यक्ती पुणे येथून भंडारा येथे आले आहेत. त्यांनी जेव्हा भंडारात प्रवेश केला तेव्हाच त्यांना इन्स्टीट्युशन क्वारंटाईन करण्यात आले होते. याच दरम्यान या दोघांचे घशांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले होते.

Two coronaviruses found Saturday in the district | जिल्ह्यात शनिवारी आढळले दोन कोरोनाबाधित

जिल्ह्यात शनिवारी आढळले दोन कोरोनाबाधित

Next
ठळक मुद्देजिल्हा प्रशासन अलर्ट । ७५४ नमुन्यांपैकी ६८९ नमुने निगेटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : आधी ग्रीन व नंतर ऑरेंज झोनमध्ये आल्यानंतर एकमेव पॉझीटिव्ह असलेली कोरोनाबाधीत महिला रुग्ण तपासणीनंतर पुन्हा निगेटिव्ह घोषित करण्यात आली. परंतु तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांपैकी शनिवारी दोन जणांचे अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. सदर दोन रूग्ण आढळल्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे.
जिल्हा प्रशासनाने सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास जिल्ह्यात नव्याने दोन कोरोना पॉझीटिव्ह रुग्ण आढळल्याचे जाहीर केले. हे दोन्ही व्यक्ती पुणे येथून भंडारा येथे आले आहेत. त्यांनी जेव्हा भंडारात प्रवेश केला तेव्हाच त्यांना इन्स्टीट्युशन क्वारंटाईन करण्यात आले होते. याच दरम्यान या दोघांचे घशांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले होते. शनिवारी दोघांचे नमुने पॉझीटिव्ह आले आहेत.
मात्र सदर दोन्ही रुग्ण पुणे येथून कोणत्या भागातून आले व भंडारा येथे कुठे राहतात याची माहिती नाही. याबाबत रविवारी सकाळी ११ वाजता जिल्हा प्रशासनातर्फे कोरोना संसर्ग झालेल्या दोन्ही इसमांची माहिती देणार असल्याचे सांगण्यात आले आहे. संक्रमीत व्यक्ती महिला की पुरुष याबाबतही माहिती नाही. आॅरेंज झोनमधून पुन्हा ग्रीन झोनमध्ये भंडारा जिल्हा जाणार अशी चिन्हे असताना दोन रुग्ण आढळल्यामुळे जिल्हा आॅरेंज झोनमध्ये राहणार आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत मुंबई, पुणे व इतर राज्यातून ३२ हजार ०६५ व्यक्ती आले आहेत. यापैकी २३ हजार ३६५ व्यक्तींचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच ८ हजार ७०० व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून घराबाहेर पडू नये अशी ताकीदही देण्यात आली आहे. शुक्रवारी ६४ व्यक्तींचे घशातील नमुने नागपूर येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी सर्वच अहवाल अप्राप्त आहेत. आतापर्यंत ७५४ नमुन्यांपैकी ६८९ नमुने निगेटिव्ह असून तीन नमुने पॉझीटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ४७५ व्यक्तींना हॉस्पीटल क्वारंटाईन तर २२३ जणांना आयसोलेशन वॉर्डातून सुटी देण्यात आली आहे.

Web Title: Two coronaviruses found Saturday in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.