शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
3
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या भारतीय ७ खलाशांची केली मदत
4
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
5
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
6
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
7
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
8
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
9
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
10
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
11
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
12
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
13
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
14
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
15
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
16
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
17
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
18
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
19
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
20
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर तालुक्यात 23 टक्के पालकांनीच दिले संमतीपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:00 IST

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात नऊ ते बारावी असे वर्ग भरण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने तुमसर तालुक्यातील शाळा प्रशासनाने शाळा सुरू केल्या. परंतु त्यास पालकांच्या अल्प प्रतिसाद मिळत आहे. वर्ग ८  ते १२  मध्ये एकूण  विद्यार्थी संख्या १२ हजार ७०३आहे. 

ठळक मुद्देतालुक्यात ६० शाळा : १२७०३ विद्यार्थी, २८९७ पालकांचे संमतीपत्र

  लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शालेय शिक्षण विभागाने वर्ग ९   ते १२ सुरू करण्याचे २३ नोव्हेंबर पासून आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या पालकांची संमती पत्र आवश्यक केले आहे. ३ डिसेंबरपर्यंत तुमसर तालुक्यातील  १२ हजार ७०३ पैकी केवळ २८९७ विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमती पत्र दिले आहे. येथे संमती पत्राचा आधार धरल्यास केवळ २३  टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसत आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याची घोषणा केली. पहिल्या टप्प्यात नऊ ते बारावी असे वर्ग भरण्याचे आदेश दिले. त्या अनुषंगाने तुमसर तालुक्यातील शाळा प्रशासनाने शाळा सुरू केल्या. परंतु त्यास पालकांच्या अल्प प्रतिसाद मिळत आहे. वर्ग ८  ते १२  मध्ये एकूण  विद्यार्थी संख्या १२ हजार ७०३आहे. त्यापैकी केवळ २१९७  पालकांनीच विद्यार्थ्यांचे संमती पत्र दिले. संमतीपत्र दिल्यानंतरही अनेक विद्यार्थी अनुपस्थित राहत आहेत.            शालेय शिक्षण विभागाने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रथम आरटीपीसीआर व त्यानंतर  ॲन्टीजेन टेस्ट करण्यास सांगितले. यात काही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पॉझिटिव आढळले. तुमसर तालुक्यात वर्ग नऊ ते बाराच्या  ६० शाळा आहेत येथे ३९९ शिक्षक व २७८ शिक्षकेतर कर्मचारी दर दिवशी हजर आहेत. स्थानिक शिक्षण विभाग त्याचे अधिकारी व कर्मचारी शाळांना भेटी देत आहेत. दोन दिवसापूर्वी शिक्षणाधिकारी संजय डोरलीकर यांनीसुद्धा भेटी दिली. शिक्षकांना मुख्याध्यापकांना व स्थानिक शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. 

पालक अनुत्सुक  विद्यार्थी पाठविण्यास पालक येथे उत्सुक दिसत नाहीत. एसटी महामंडळाने मानव विकास अंतर्गत बसगाड्या सुरू केले आहेत. स्थानिक विद्यार्थी शाळेत येण्यास उत्सुक दिसत नाही. शिक्षण विभाग दर दिवशी शाळेत उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची माहिती घेत आहे. परंतु त्यात वाढ होताना दिसत नाही.  शाळा प्रशासनाने सर्व सुविधा विद्यार्थ्याकरिता उपलब्ध करून दिले आहेत, हे विशेष. 

तुमसर तालुक्यात एकूण ६० शाळा असून सर्व शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. पालकांची संमती पत्र विद्यार्थी घेऊन येत आहेत. यामध्ये पुन्हा वाढ होत आहे. विद्यार्थी व पालकांचा आत्मविश्वास वाढवण्याकरता प्रयत्न सुरू आहेत. येथे आठ ते दहा दिवसांमध्ये विद्यार्थी संख्या निश्चितच वाढेल असा आम्हाला विश्वास आहे. -विजय आदमने, गटशिक्षणाधिकारी तुमसर.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याSchoolशाळा