शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

शास्त्री विद्यालयात वाहतूक सुरक्षा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:41 IST

भंडारा : वाहतूक नियंत्रण शाखा भंडारा यांच्याकडून स्थानिक लाल बहादूर शास्त्री विद्यालयात वाहतूक सुरक्षा, जीवन सुरक्षा कार्यक्रम घेण्यात ...

भंडारा : वाहतूक नियंत्रण शाखा भंडारा यांच्याकडून स्थानिक लाल बहादूर शास्त्री विद्यालयात वाहतूक सुरक्षा, जीवन सुरक्षा कार्यक्रम घेण्यात आला. दि. १५ जानेवारी ते दि. १७ फेब्रुवारी दरम्यानचा कालावधी वाहतूक सुरक्षाविषयक जनजागृती करण्यास्तव शहरात व जिल्ह्यात विविध ठिकाणी वाहतूक नियंत्रण विभागाकडून वाहतूक सुरक्षा अभियान राबविले जातेय. हेल्मेटचा वापर, दुचाकीवरून जाताना मोबाइलचा वापर न करणे, चारचाकी वाहनात सीटबेल्टचा वापर करणे, गाडी चालवताना मद्यप्राशन न करणे,शाळेत जाताना येताना, रस्ता ओलांडताना सिग्नल्सची भाषा समजून घेणे, सुरक्षित रस्ता ओलांडणे, सायकल वा दुचाकीवाहनावरून जाताना हातात हात घालून मैत्रीचे प्रदर्शन न करणे, जमावाने एकत्र येऊन वाहतुकीची कोंडी न करणे रस्त्यावर क्रिकेट अथवा पतंग न खेळणे अशा वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या विविध बाबींवर वाहतूक नियंत्रण शाखा भंडाराचे पोलीस उपनिरीक्षक श्रीधर शहारे यांनी मार्गदर्शन केले. मुलांच्या व शिक्षकांच्या दुचाकी व सायकलींना रिफ्लेक्टर्स लावून ते लावण्याचे प्रयोजन त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

याप्रसंगी वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी पो. ना. स्वप्नील गुल्हाने, पो.ना. कार्तिक कामथे हे उपस्थित होते. प्रारंभी शाळेच्या प्राचार्या केशर बोकडे यांनी सर्व अतिथींचे पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या वतीने स्वागत केले. दहावीचा विद्यार्थी तन्मय नवलाखे यानेही त्याचे अनुभव कथन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गालफाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन माध्यमिक विभाग प्रमुख शालिकराम ढवळे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यास क्रीडाप्रमुख सुनील खिलोटे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास इयत्ता दहावी व सातवीचे विद्यार्थी उपस्थित होते. कोरोना संक्रमणाच्या काळाचे भान ठेवून सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमावली अनुसरून कार्यक्रम घेण्यात आला.