१०० वर्ष जुन्या मांगठ्यावर तयार होतात परंपरागत सुती गोणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 05:00 AM2020-12-17T05:00:00+5:302020-12-17T05:00:21+5:30

जिल्ह्यात विणकरांची संख्या मोठी आहे. काही वर्षापूर्वी चकारा येथे सुमारे २०० विणकर शाॅल, गोणा, लुगडे, ब्लँकेट, धोतर आदी तयार करीत होते. त्या काळात त्याला मोठी मागणीही होती. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाने हातमाग व्यवसाय मागे पडला. अनेक जण आता नोकरी - व्यवसायात रमले आहेत. चकारा येथे केवळ दोन घरी विणकाम केले जाते. तेथेही केवळ सुती गोणे तयार करतात. गुलाब वालदे यांच्या घरी दीडशे वर्षांपासून परंपरागत विणकाम केले जाते.

Traditional cotton sacks are made on 100 year old mangatha | १०० वर्ष जुन्या मांगठ्यावर तयार होतात परंपरागत सुती गोणे

१०० वर्ष जुन्या मांगठ्यावर तयार होतात परंपरागत सुती गोणे

Next
ठळक मुद्देचकारा येथे एकमेव हातमागावर विणकाम

  लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कधी काळी भंडारा जिल्ह्यातील गावागावांत सुरु असलेले हातमाग आता काळाच्या ओघात बंद पडले असले तरी पवनी तालुक्यातील चकारा येथे एक परिवार १०० वर्ष जुन्या मांगठ्यावर आजही सुती गोणे तयार करीत आहेत. पुर्वी सारखी मागणी नसली तरी आपला परंपरागत व्यवसाय या परिवाराने टिकवून ठेवला आहे. 
जिल्ह्यात विणकरांची संख्या मोठी आहे. काही वर्षापूर्वी चकारा येथे सुमारे २०० विणकर शाॅल, गोणा, लुगडे, ब्लँकेट, धोतर आदी तयार करीत होते. त्या काळात त्याला मोठी मागणीही होती. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाने हातमाग व्यवसाय मागे पडला. अनेक जण आता नोकरी - व्यवसायात रमले आहेत. चकारा येथे केवळ दोन घरी विणकाम केले जाते. तेथेही केवळ सुती गोणे तयार करतात. गुलाब वालदे यांच्या घरी दीडशे वर्षांपासून परंपरागत विणकाम केले जाते. त्यांच्याकडे १०० वर्ष जुना मांगठा असून तो लाकडापासून बनविलेला आहे. आजही त्यावरच विणकाम केले जाते. ४२ फुटापर्यंत लांबीचे गोणे येथे तयार होतात. दिवसाला एक गोणा तयार होत असून आठवड्यात पाच ते सहा गोणे तयार केले जातात. एक हजार रुपयाला या गोण्यांची विक्री होते. या कामात गुलाब वालदे यांच्या पत्नीही सहकार्य करतात. मात्र योग्य माेबदला मिळत नाही.

हातमाग महामंडळाने काम केले बंद
हातमाग महामंडळाच्या माध्यमातुन हातमागाला प्रोत्साहन दिले जायचे. अनेक कुटुंब त्यात सहभागी होते. दुरदूरपर्यंत उत्पादनाची मागणी होती. परंतु अलीकडे फॅन्सी माल हवा आहे. आता हा माल चालत नाही. असे सांगून १९९८ साली हातमाग महामंडळाने काम बंद केले, असे चकारा येथील गुलाब वालदे यांनी सांगितले. त्यावेळी आम्ही हवा तसा माल देऊ असे सांगितले. परंतु उपयोग झाला नाही. अनेक जण आज बेरोजगार झाल्याचेही ते म्हणाले. 

हँडलूम क्लस्टरसाठी ग्रीन हेरीटेजचा पुढाकार
भंडारा जिल्ह्यातील हातमाग व्यवसायाला चालना देण्यासाठी ग्रीन हेरीटेज या संस्थेने आता पुढाकार घेतला आहे. संस्थेचे अध्यक्ष मो.सईद शेख यांनी चकारा येथे भेट देऊन विणकरांशी संवाद साधला. या उद्योगासाठी येथे पुरक वातावरण असून वस्त्रोद्योग मंत्रालयाकडून हँडलूम क्लस्टर तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी संदीप कदम यांना निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Traditional cotton sacks are made on 100 year old mangatha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.