शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

मंगळसूत्र घालून तरूणीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 21:59 IST

एकाच वर्गात शिक्षण घेत असलेल्या आपल्याच गावातील तरूणीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिच्यावर सातत्याने शारीरिक अत्याचार केल्याचे प्रकरण येथील राजीव गांधी चौक परिसरात उघडकीस आले. याप्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात मोहाडी तालुक्यातील मोरगाव येथील एका तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देतरूणावर गुन्हा : राजीव गांधी चौकातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एकाच वर्गात शिक्षण घेत असलेल्या आपल्याच गावातील तरूणीच्या गळ्यात मंगळसूत्र घालून तिच्यावर सातत्याने शारीरिक अत्याचार केल्याचे प्रकरण येथील राजीव गांधी चौक परिसरात उघडकीस आले. याप्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात मोहाडी तालुक्यातील मोरगाव येथील एका तरूणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राम तुलाराम हारगुळे (२२) रा. मोरगाव तालुका मोहाडी असे गुन्हा दाखल झालेल्यांचे नाव आहे. तो भंडारा येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्यासाठी त्याने राजीव गांधी चौकात रूम भाड्याने घेतली होती. त्याठिकाणी राहून तो शिक्षण घेत होता. मात्र तीन वर्षापुर्वी त्याच्याच वर्गात शिकणारी आणि गावातीलच एका तरूणीसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले. प्रेमाच्या आणाभाकाही घेतल्या. दरम्यान सदर तरूणीला आपल्या किरायाच्या खोलीवर आणले.त्याठिकाणी तिला विश्वासात घेवून लग्नाचे आमिष दाखविले. एवढेच नाही तर लग्न करण्याचे नाटक करीत तिच्या गळ्यात मंगळसुत्र आणि कुंकुवाने मांग भरली. यामुळे सदर तरूणीचा रामवर विश्वास बसला. यादरम्यान तिच्यासोबत अनेकदा शारीरिक अत्याचार केले. मात्र आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तिने ५ डिसेंबर रोजी मोहाडी पोलीस ठाणे गाठले. त्याठिकाणी राम हारगुळेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र घटनास्थळ भंडारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने प्रकरण भंडारा पोलिसांकडे वळते करण्यात आले. भंडारा ठाण्यात कागदपत्र प्राप्त झाल्यावरून पोलीस शिपाई पवित्रा सुरजमल शरणागत यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चौथनकर करीत आहे.जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या घटना अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अल्पवयीन तरूण-तरूणी पळवून जाण्याचे प्रकारही वाढले आहे.