शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

बपेरात टुमदार शौचालयांची निर्मिती

By admin | Updated: February 26, 2017 00:23 IST

मध्यप्रदेश सिमेलगतच्या आणि बावनथडी नदीकाठावर वसलेल्या बपेरा गावाची ओळख ‘हागणदारी’ गाव अशी आहे.

ग्रामस्थांचा पुढाकार : ओडिएफमध्ये ५० शौचालयांची कामे पूर्णप्रशांत देसाई भंडारामध्यप्रदेश सिमेलगतच्या आणि बावनथडी नदीकाठावर वसलेल्या बपेरा गावाची ओळख ‘हागणदारी’ गाव अशी आहे. आता या गावाची अशी ओळख पुसल्या जाणार आहे. येथील ग्रामस्थांनी टुमदार सिमेंट काँक्रीटचे पक्के शौचालय बांधत असून जिल्हा स्वच्छता मिशनअंतर्गत (ओडीएफ) गावात शौचालयाचे कामे अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे हे गाव आता ‘हागणदारीमुक्त’ होणार आहे. बपेराची ही वाटचाल अन्य गावांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.तुमसर पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या बपेरा हे गाव मध्यप्रदेशच्या सिमेलगत आहे. या गावाला शासकीय योजनांचा लाभ मिळतो, पण अनेकांना डावलण्यात येते अशा तक्रारींची शासकीय दफ्तरी नोंद आहे. दुर्लक्षित असलेल्या बपेरा गावाची लोकसंख्या २,६८५ एवढी असून या गावात ५२५ कुटुंब वास्तव्यास आहेत. या गावातील अनेकांकडे शौचालये आहे. यातील अनेकजण शौचालयाचा वापर करीत असले तरी, त्यापेक्षा जास्त नागरिक उघड्यावरच शौचासाठी जातात. त्यामुळे या गावातील नागरिकांना घरी शौचालय बांधण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाचे पथक व तुमसर पंचायत समितीचे गटसंसाधन केंद्र (पाणी व स्वच्छता) च्या पथकाने मार्गदर्शन केले. उघड्यावर शौचास जाण्याने होणाऱ्या आजाराचे दुष्परीणाम ग्रामस्थांना पटवून सांगितले. त्यामुळे अनेकांनी घरी शौचालय बांधण्यासाठी पुढाकार घेतला. या गावातील ७४ कुटुंबांकडे शौचालय नसल्यामुळे त्यांनी उघड्यावर जाणे सुरूच ठेवले होते. या कुटुंबियांचे मनपरिवर्तन करून शौचालय उभारणीसाठी बाध्य केले. बपेरा या गावात आता शौचालय उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून ७४ पैकी ४१ शौचालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित लोकांनी खड्डे करून शौचालयाचे बांधकाम सुरू केले आहे. बपेरा गावातील अनेक घरे कौलारू तर काही घरे स्लॅबची आहेत. यातील काहींकडे शौचालय नसल्याने त्यांनी आता शौचालय बांधकाम सुरू केले आहे. नवनिर्मित सर्व शौचालये स्लॅबची आहेत. शौचालयाला लागून बाथरूमचे बांधकाम करण्यात आले आहे. यात नळ फिटींग केले आहे. कौलारू घरासमोर आता बपेरात टुमदार स्लॅबचे शौचालय झाले आहे. बपेरा ग्रामवासीयांनी शौचालय बांधकाम करून उचलेले हे पाऊल विकासाकडे नेणारे आहे. सरपंच साधना वालदे, संवाद सल्लागार राजेश्वर येरणे, समूह समन्वयक शशिकांत घोडीचोर, सचिव पटले, रोजगारसेवक उंदीरवाडे, योगराज धमगाये यांनी गावात शौचालय निर्मितीवर भर दिला. तीन वर्षांची प्रतीक्षा संपेल तीन दिवसांतमागील तीन वर्षांपासून बपेरा गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी मिशन कक्ष कार्यरत आहे. आता गावातील शौचालयाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. दरम्यान गावाला भेटी देऊन त्यांच्या समस्या जाणून घेत शौचालय बांधकाम करण्याची गळ घालण्यात आली. यावेळी अनेकांनी या पथकाची टर उडविली. मात्र, पथकाने हार न मानता कार्य निरंतर सुरू ठेवले. याची फलश्रुती बपेरा गावात २८ फेब्रुवारीपर्यंत सर्व शौचालयाचे बांधकाम पूर्ण होणार असल्याचा विश्वास पथकाने व्यक्त केला आहे. मागील तीन वर्षांपासून सुरू असलेला शौचालयाचा पाठपुरावा आता तीन दिवसात पूर्ण होणार आहे.अशी झाली कामाची वाटचालबपेरातील अनेकांकडे शौचालय नसल्याने त्याचे बांधकाम करण्यासाठी मिशन कक्षाने गावात सभा लावली होती. यात त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी अनेकांनी त्यांच्याकडे जागा व पैशाची अडचण असल्याचे सांगून हात वर केले. मात्र पथकाने कच न खाता वैयक्तिक शौचालय बांधकामावर भर दिला. गृहभेटीतून कुटुंबाशी संवाद साधून त्यांनी शौचालयाचे महत्व पटवून दिले. वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शनामुळे ग्रामस्थ प्रेरीत होऊन शौचालयाचे काम पूर्णत्वास नेले आहे.