शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

टिप्पर चालकाची अरेरावी; वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2017 00:52 IST

विरूद्ध दिशेने येणाऱ्या टिप्परला साइड देऊनही टिप्परचालकाने सुमोचालकाशी अरेरावी केल्यामुळे संतप्त सुमोचालक

लोकमत न्यूज नेटवर्क विरली बु. : विरूद्ध दिशेने येणाऱ्या टिप्परला साइड देऊनही टिप्परचालकाने सुमोचालकाशी अरेरावी केल्यामुळे संतप्त सुमोचालक आणि प्रवाशांनी सदर टिप्पर अडविला. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या इतर वाहनचालक आणि गावकऱ्यांचे या सुमोचालकाला पाठबळ मिळाल्याने सुमारे तीन तास विरली बु ते इटान मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. ही घटना बुधवारला रात्री साडेसातच्या सुमारास या मार्गावर विरली जवळ घडली. लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहतूक पूर्ववत सुरू केली. परिसरात बीएसएनएलच्या अंडरग्राऊंड लाईनचे काम सुरू आहे. या खोदकामाची माती विरली -इटान मार्गावर रस्त्याच्या कडेला टाकली आहे. या रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी ठिकठिकाणी गिट्टीचे ढिग रस्त्याच्या दुसऱ्या कडेला टाकलेले आहेत. घटनेच्या वेळी इटान रेतीघाटावरून ओव्हरलोड रेती भरून येणाऱ्या टिप्पर क्रमांक एमएच ४० एके ६५५७ विरली बु. कडून जाणाऱ्या पाटुरू कंपनीच्या एमएच १४ डीटी ३५० क्रमांकाच्या टाटा सुमोचालक शरद मेश्राम यांनी साइड दिली. मात्र, टिप्परचालकाने सुमोसमोर असलेल्या गिट्टीच्या ढिगावरून ने असे सुमोचालकाला दरडावले. त्यामुळे संतप्त झालेल्या सुमोचालक आणि गाडीत असलेल्या पाटुरू कंपनीच्या कार्यकर्त्यांनी टिप्पर अडविला. याचवेळी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या इतर वाहनचालक आणि गावकऱ्यांच्या समर्थनामुळे वाहतुक ठप्प झाली. सुमारे तीन तास वाहतूक ठप्प झाल्याने इटान रेतीघाटावरून ओव्हरलोड रेती वाहतूक करणाऱ्या दहा-बारा टिप्परची रीघ लागली होती. याप्रसंगी संतप्त गावकऱ्यांनी टिप्परच्या काचा फोडल्या. घटनेची माहिती मिळताच लाखांदुरचे प्रभारी ठाणेदार चौधरी, पोलीस उपनिरीक्षक राखडे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. लाखांदूर पोलिसांनी दोन्ही बाजुंची समजूत घालून रस्ता मोकळा करून वाहतुक पूर्ववत सुरू केली. याप्रसंगी संतप्त गावकऱ्यांनी ओव्हरलोड रेती भरलेले सुमारे दहा-बारा टिप्पर अडविले. मात्र रात्री १० ला वाहतूक सुरू होईपर्यंत महसूल विभागाचा कोणताही कर्मचारी घटनास्थळी दाखल झाला नाही. हे सर्व टिप्पर ओव्हरलोड आणि विनारॉयल्टी रेतीवाहतूक करीत असल्याचे समजते. टिप्परच्या कारवाईपोटी सुमारे ६ लाख रूपयांचा महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला असता यासंबंधी प्रभारी तहसीलदार कावळे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी संंबंधित राजस्व निरीक्षक आणि तलाठ्यांना सुचना दिल्याचे सांगितले.