शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाच्या मोटरसायकलसमोर आला वाघ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2021 05:00 IST

जंगलपासून ८ कि.मी. अंतरावरील शिवारात पट्टेदार वाघाचे दर्शन होऊ लागले आहेत. शुक्रवारी देवसरा येथील ज्ञानेश्वर बिसेन हे पत्नी व मुलाला घेऊन मोटारसायकलने सुकलीनकुल येथून रात्री ९ वाजेच्या सुमारास गावाकडे जात होते. गोंडीटोला तलावालगत  रस्त्यावर पट्टेदार वाघाचे दर्शन झाले आहे. वाघ दिसताच त्यांची भंबेरी उडाली आहे. त्यामुळे सुकली नकुल गावाकडे परत गेले.

रंजित चिंचखेडेलोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड ( सिहोरा ) : पत्नी आणि मुलासह गावी जाणाऱ्या एका तरुणाच्या मोटरसायकलसमोर अचानक वाघ आल्याची घटना देवसरा ते सुकळी नकुल मार्गावरील गोंडीटोला तलावजवळ शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. अचानक वाघ समोर आल्याने त्याची पाचावर धारण बसली. रात्रीच या प्रकाराची माहिती वनविभागाला देण्यात आली. तुमसर तालुक्यातील गोंडीटोला परिसरातील शेत शिवारात पट्टेदार वाघाचे पगमार्क आढळले असून यापूर्वीही काहींना वाघाचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वाघाच्या भीतीने सायंकाळ होताच संपूर्ण मार्गावर लॉकडाऊन होते. चांदपूरच्या ग्रीन व्हॅली राखीव जंगलात वाघाचे संख्येत वाढ झाली आहे. जंगल शेजारी असणाऱ्या मुरली येथे वाघाचे रोज दर्शन होत आहे. या वाघांने गाय, शेळ्या फस्त केल्या आहेत. जंगलपासून ८ कि.मी. अंतरावरील शिवारात पट्टेदार वाघाचे दर्शन होऊ लागले आहेत. शुक्रवारी देवसरा येथील ज्ञानेश्वर बिसेन हे पत्नी व मुलाला घेऊन मोटारसायकलने सुकलीनकुल येथून रात्री ९ वाजेच्या सुमारास गावाकडे जात होते. गोंडीटोला तलावालगत  रस्त्यावर पट्टेदार वाघाचे दर्शन झाले आहे. वाघ दिसताच त्यांची भंबेरी उडाली आहे. त्यामुळे सुकली नकुल गावाकडे परत गेले. त्यांनी नातेवाइकांना माहिती दिली. रात्रीच बपेरा सहायक वन परिक्षेत्र कार्यलयात माहिती देण्यात आली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची ज्ञानेश्वरकडून वाघाची माहिती घेतली. बिसेन यांना वाघ दिसलेल्या अर्ध्या किमी. परिसरात गेल्या वर्षात पट्टेदार वाघाने तीन जनावर हल्ला केला होता. शनिवारी सकाळी गोंडीटोला मार्गावर पट्टेदार वाघाचे पगमार्क आढळून आले. ही माहिती होताच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

हरीण आणि रानडुक्कराच्या मागावर वाघ- गोंडीटोला, बिनाखी गावांचे शेत शिवारात हरीण व रानडुक्कराचे कळप दिसून येत आहेत. आता त्यात पट्टेदार वाघाने भर घातली आहे. असल्याने शिकारीसाठी वाघ त्यांच्या मागावर असतो. या तीन गावांचे शिवारात वाघाला शिकार प्राप्त होत असल्याने वाघ तळ ठोकून राहत असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग