शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

बोरी गावात चुली पेटल्याच नाही

By admin | Updated: July 21, 2014 00:02 IST

काळ कधी कसा येईल, याचा नेम नाही. अगदी आनंदात असलेल्या वातावरणावर विरजण घालत काळाने झडप घालून क्षणात तिघांना नियतीने हिरावले. बोरी गावातील तीन युवकांचा शनिवारी

सर्वत्र हुंदके व स्मशानशांतता : तिघांवर काळाची झडप, प्रकरण पांजरा येथील अपघाताचेयुवराज गोमासे - करडी पालोराकाळ कधी कसा येईल, याचा नेम नाही. अगदी आनंदात असलेल्या वातावरणावर विरजण घालत काळाने झडप घालून क्षणात तिघांना नियतीने हिरावले. बोरी गावातील तीन युवकांचा शनिवारी अपघाती मृत्यू झाल्याने ४०० लोकसंख्येच्या गावात फक्त रडण्याचा आवाज ऐकू येत आहे. कुणाचा मित्र, कुणाचा मुलगा, कुणाचा जवळचा नातेवाईक या अपघातात गमावले गेल्याने सायंकाळी गावात स्मशानशांतता पसरली. दु:खाच्या आवेगात गावात चुली पेटल्याच नाही. तिघांवरही रविवारी रात्री सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी गावकऱ्यांच्या अश्रूंचा बांध कोणीच थांबवू शकला नाही. पांजरा नाल्यावरील पुलावर शनिवारी रात्री ८.१५ वाजताच्या दरम्यान अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकी चालक भोलेश्वर चांदेवार (२३), उज्ज्वल ऊर्फ क्रांतिवीर परिहार (१७) व दिनेश मेश्राम (२६) या तिघांचा हकनाक जीव गेला. तिघेही सरपंच भगवान चांदेवार यांच्या दुचाकीने पालोरा येथील आठवडी बाजाराला गेले होते. स्वगावी परत येत असताना रात्रीच्या अंधारात काळाने त्यांच्यावर झडप घातली. अपघात इतका भयानक होता की, दुचाकीचा समोरील भागाचा चेंदामेंदा झाला. तिन्ही तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. भोलेश्वरच्या तर छातीचा पिंजरा आत दाबल्या गेला होता. तिघांचेही दु:खाने विव्हळणे सुरु होते. दगडालाही पाझर फुटला असता, अशा वेदनेत असलेल्या तिन्ही जखमींवर उपचारासाठी मदत देण्याऐवजी मानुसकी गमावलेल्या अज्ञात वाहनचालकाने घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती होताच पालोरा, पांजरा व बोरी गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना उपचारासाठी मदतीचा हात दिला. या भिषण अपघाताने रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. रस्त्यावर दुचाकीचे तुकडे अस्तव्यस्त पडले होते. त्यावरूनच अपघाताची भिषणता लक्षात येत होती. करडी पोलिसांच्या मदतीने तिघांनाही भंडारा येथे उपचाराकरिता दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भोलेश्वर व उज्ज्वल यांची प्राणज्योत मालवल्याचे सांगितले. गंभीर जखमी दिनेशला पुढील उपचाराकरिता नागपुरला हलविण्यात आले. दिनेश कुटुंबात एकुलता एक व घरातील कर्ता असल्याने गावात सर्वत्र मनोमन प्रार्थना होत असताना रविवारी दुपारी १२.३० वाजता वैद्यकीय महाविद्यालयात त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही माहिती धडकताच गावात स्मशान शांतता पसरली. आधीच गावातील दोन जीव गमविलेल्या गावकऱ्यांवर दिनेशच्या मृत्यूच्या बातमीने शोककळा पसरली. जो तो आठवणीत गहिवरताना दिसत आहे. सरपंच भगवान चांदेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत तिघांवरही बोरी येथील स्मशानभूमीत अत्यंत शोकाकुल वातावरणात सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मृतांच्या नातेवाहीकांसोबतच अंत्यसंस्काराला उपस्थित जनसमुदायालाही त्यांचे अश्रू आवरता आले नाही. मन हेलावून सोडणाऱ्या या घटनेने बोरी गावात मात्र चुली पेटल्या नाही.