शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकचे चाक डोक्यावरुन गेल्याने विस्तार अधिकारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2022 05:00 IST

मंगळवारी रात्री ते लाखनी वरुन भंडारा येथे आले. जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात ठेवलेली दुचाकी घेऊन  ते खात रोडवरील आपल्या घराकडे जात होते. खांब तलाव चौकातील खड्डेमय रस्त्यावर त्यांची दुचाकी अचानक खड्ड्यातून उसळली आणि ते दुचाकीसह खाली कोसळले. त्याचवेळी मागेहून आलेल्या ट्रकच्या चाकाखाली त्यांचे डोके आले. अपघात एवढा भीषण होता की त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खड्ड्यातून दुचाकी स्लीप झाल्यानंतर त्याचवेळी मागेहून आलेल्या ट्रकच्या चाकाखाली डोके चिरडून विस्तार अधिकारी जागीच ठार झाला. ही घटना भंडारा शहरातील खांब तलाव चौकात मंगळवारी रात्री ९.४५ वाजताच्या सुमारास घडली. शहरातील खड्ड्यांनी गत दहा दिवसात तीन बळी घेतले. केवळराम सहादेव पंचभाई (४२) रा. गंगानगर, खात रोड खोकरला, भंडारा असे मृताचे नाव आहे. ते लाखनी पंचायत समितीमध्ये महिला व बालविकास प्रकल्प विभागात विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत होते. मंगळवारी रात्री ते लाखनी वरुन भंडारा येथे आले. जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात ठेवलेली दुचाकी घेऊन  ते खात रोडवरील आपल्या घराकडे जात होते. खांब तलाव चौकातील खड्डेमय रस्त्यावर त्यांची दुचाकी अचानक खड्ड्यातून उसळली आणि ते दुचाकीसह खाली कोसळले. त्याचवेळी मागेहून आलेल्या ट्रकच्या चाकाखाली त्यांचे डोके आले. अपघात एवढा भीषण होता की त्यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. यावेळी वीजपुरवठा ही खंडित झाला होता आणि पाऊसही सुरू होता.  या घटनेची माहिती भंडारा शहर पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोलीस दाखल झाले. तोपर्यंत ट्रक पसार झाला होता. मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. या अपघाताचा तपास ठाणेदार सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी करीत आहेत. 

पत्नीने ९ वाजता केला होता फोन- दररोज वेळेत घरी येणारे केवळराम मंगळवारी रात्री ९     वाजेपर्यंतही घरी आले नाही. म्हणून पत्नीने त्यांना फोन केला. त्यावेळी त्यांनी पाऊस असल्याने जिल्हा परिषदेत थांबल्याचे सांगितले. पाऊस थांबला की घराकडे निघतो असेही सांगितले. मात्र, त्यानंतर पत्नीने १० वाजताच्या सुमारास फोन लावला तेव्हा फोन बंद येत होता. दरम्यान काही वेळात या अपघाताची माहितीच पत्नीला मिळाली. कुटुंबावर जणू आभाळच कोसळले.बांधकाम विभाग आणखी किती जणांचे बळी घेणार?- शीतलामाता मंदिर परिसरात रस्त्याचे काम गत तीन वर्षांपासून थांबले आहे. परिणामी, या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. भंडारा ते रामटेक हा राष्ट्रीय महामार्ग आणि भंडारा ते तुमसर हा राज्य मार्ग येथूनच जातो. शीतला माता मंदिर, बहिरंगेश्वर चौक, किसान चौक, शास्त्री नगर आणि वरठीपर्यंत या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, पावसामुळे रस्त्यावरील खड्डे दिसत नाही आणि अपघात होत आहेत.

 

टॅग्स :Accidentअपघात