शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
2
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
3
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
4
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
5
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
6
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
7
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
8
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
9
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
10
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
11
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
12
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
13
हे भोंदू बुवा आणि बाबा इतके का आणि कसे बोकाळले?
14
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
15
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
16
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
17
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
18
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
19
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
20
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बसच्या धडकेत कापड व्यापारी ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 05:00 IST

प्रकाश बाळकृष्ण हटनागर (४०) रा.सानगडी (ता.साकोली) असे मृताचे नाव आहे. प्रकाश हटनागर गुरुवारी फटाक्याच्या दुकानाचा परवाना नुतनीकरणासाठी भंडारा येथे दुचाकीने जात होते. लाखनीजवळ देवरीवरुन नागपूरकडे जाणाऱ्या एसटी बसने (एमएच ४० एल ८८१९) दुचाकीला मागून धडक दिली. तो खाली कोसळला आणि त्याचवेळी एसटीचे चाक त्याच्या डोक्यावरुन गेल्याने जागीच मृत्यू झाला. 

ठळक मुद्देलाखनीची घटना : चाक डोक्यावरुन गेल्याने जागीच मृत्यू

लाेकमत न्यूज नेटवर्कलाखनी : भरधाव एसटी बसने दुचाकीला मागून धडक दिल्याने कापड  व फटाका व्यापारी जागीच ठार झाल्याची घटना लाखनी येथे राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी सकाळी ११.३० वाजता घडली. प्रकाश बाळकृष्ण हटनागर (४०) रा.सानगडी (ता.साकोली) असे मृताचे नाव आहे. प्रकाश हटनागर गुरुवारी फटाक्याच्या दुकानाचा परवाना नुतनीकरणासाठी भंडारा येथे दुचाकीने जात होते. लाखनीजवळ देवरीवरुन नागपूरकडे जाणाऱ्या एसटी बसने (एमएच ४० एल ८८१९) दुचाकीला मागून धडक दिली. तो खाली कोसळला आणि त्याचवेळी एसटीचे चाक त्याच्या डोक्यावरुन गेल्याने जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती होताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. बसचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक अमोल तांबे तपास करीत आहेत. प्रकाशच्या मागे पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. लाखनी येथे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरु आहे. त्यामुळे येथे वाहतुकीची नेहमी कोंडी होते. अनेक अपघातही घडतात. सुरक्षेची कोणतीही जबाबदारी संबंधित कंपनीने घेतली नाही. रस्ता सुरक्षा सप्ताहात हा अपघात झाला असुन या अपघाताला जबाबदार कोण असा प्रश्न आहे. 

टॅग्स :Accidentअपघात