शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ संस्थेने भरली होती कराची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:31 IST

भंडारा : तालुक्यातील मोरगाव (शहापूर) येथील महाराष्ट्र मेटल पावडर कर्मचारी सहकारी पतसंस्थेत कराची रक्कम न भरणे व अन्य ...

भंडारा : तालुक्यातील मोरगाव (शहापूर) येथील महाराष्ट्र मेटल पावडर कर्मचारी सहकारी पतसंस्थेत कराची रक्कम न भरणे व अन्य मुद्द्यांना घेऊन गैरप्रकार झाल्याची तक्रार पतसंस्थेचे संचालक लालाजी बारसागडे यांनी केली होती. या प्रकरणी आयकर विभागामार्फत पावतीच उपलब्ध झाल्याने सदर संस्थेत आयकराची ८४ हजार रूपयांची रक्कम भरल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात सहायक उपनिबंधकांनाही कळविण्यात आल्याचे संचालकांनी सांगितले.

माहितीनुसार, संस्थेचे संचालक लालाजी बारसागडे यांनी सदर पतसंस्थेत गैरप्रकार झाल्याची तक्रार सहायक निबंधकांकडे केली होती. या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मंडळ दरमहा मासिक सभा घेतात. मात्र बारसागडे यांना चार सभांना बोलविले नाही तसेच सूचनाही दिली नाही, असे तक्रारीत नमूद होते. तसेच संस्थेने आयकर भरला नाही परंतु जमाखर्च पत्रकात मात्र ८४ हजार रुपये कराची नोंद केली असल्याचेही तक्रारीत म्हटले होते. यासंदर्भात सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अंतर्गत अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांना मिळालेल्या पत्रानुसार व त्यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर संस्थेत कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचे म्हटले आहे. बारसागडे यांनी केलेला आरोप धादांत खोटे असल्याचेही या संचालकांचे म्हणणे आहे. बारसागडे सभेमध्ये आल्यावर असभ्य वर्तणूक करीत असल्यामुळे २५ ऑगस्ट रोजी च्या सभेत चर्चा करून त्यांना बडतर्फ करण्यात आल्याचेही संचालकांनी सांगितले. त्यांची ८२ सभासदांनी त्यांच्याबाबत तक्रार केली होती. यात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा विश्वास नाही, असे लेखी पत्रही संस्थेला दिले होते तसेच २०१९-२० च्या आर्थिक वर्षात संस्थेचे लेखापरीक्षक सात पैसे यांनी दिलेल्या सूचनेनुसार सन २०२०-२१ च्या अंदाजपत्रकात अंतर्गत आयकराची रक्कम ८४ हजार रुपये ३१ मार्च २०२० रोजी बँक ऑफ इंडियामध्ये जमा करण्यात आले आहे. याबाबत धनादेश क्रमांकासह चार्टर्ड अकाउंटंट फुंडे यांच्या सांगितल्याप्रमाणे ही भरण्यात आल्याचे माहितीत नमूद आहे. सदर रक्कम शासकीय कोषागारात भरणा केली असल्यानंतरही बारसागडे यांनी तक्रार सादर केल्याने प्रश्नचिन्ह उभे झाले, अशी माहिती संस्थेचे सभासद चंद्रभान कारेमोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.