राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोल घेऊन जाणारा टँकर उलटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:00 IST2020-03-03T05:00:00+5:302020-03-03T05:00:38+5:30

प्राप्त माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास नागपूर वरून डिझेल व पेट्रोल सारखा ज्वलनशील पदार्थ भरून येत असलेला टँकर क्रमांक ३५ के ३९५४ गोंदियाकडे जात होता. तीव्र गतीने चालत असलेल्या या टँकरवरील वाहन चालकाचे संतुलन वाहनावरून सुटला. त्यामुळे टँकर सराटी फाट्याजवळ उलटला. ज्वलनशील पदार्थ या टँकरमध्ये असल्याने पोलिसांना माहिती मिळताच साकोली, लाखनी व महामार्ग पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले.

A tanker carrying petrol on the national highway was overturned | राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोल घेऊन जाणारा टँकर उलटला

राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोल घेऊन जाणारा टँकर उलटला

ठळक मुद्देअनर्थ टळला : सराटी फाट्यानजीकची घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : राष्ट्रीय महामार्गावर सराटी फाट्यानजीक भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल व डिझेल घेऊन जाणारा टँकर उलटल्याने महामार्गावरील वाहतूक व्यवस्था खोळंबली. पोलीस प्रशासन व महामार्ग पोलिसांच्या तत्परतेने एक मोठी दुर्घटना टळली. यामध्ये बीपीसीएल कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणा उजेडात आला.
प्राप्त माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास नागपूर वरून डिझेल व पेट्रोल सारखा ज्वलनशील पदार्थ भरून येत असलेला टँकर क्रमांक ३५ के ३९५४ गोंदियाकडे जात होता. तीव्र गतीने चालत असलेल्या या टँकरवरील वाहन चालकाचे संतुलन वाहनावरून सुटला. त्यामुळे टँकर सराटी फाट्याजवळ उलटला. ज्वलनशील पदार्थ या टँकरमध्ये असल्याने पोलिसांना माहिती मिळताच साकोली, लाखनी व महामार्ग पोलीस दल घटनास्थळी दाखल झाले. गंभीरतेने या घटनेची दखल घेत पोलीस प्रशासनाने घटनास्थळ गाठून अप्रिय घटना घडू नये, याची दक्षता घेत घटनास्थळी फायर ब्रिगेडचे वाहन, क्रेन ताबडतोब बोलविले व वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू राहावी, याकरिता दक्षता घेतली. बºयाच विलंबानंतर बीपीसीएलचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. टँकरमधील पेट्रोल व डिझेल रिकामे करण्यासाठी जनरेटर पंप व खाली टँकर हा दुपारनंतर पोहोचल्याने पोलिसांना वाहतूक व्यवस्था सांभाळण्यात तारेची कसरत करावी लागली. झालेला घटनाक्रम वृत्तसंकलन करण्यासाठी गेलेल्या मीडिया कर्मी यांनी बीपीसीलच्या अधिकाऱ्यांनी अभद्र व्यवहार केला.
टँकरमधून सांडत असलेल्या पेट्रोल व डिझेल नेण्याकरिता वाटसरुनी टँकर जवळ डबकी व प्लॉस्टिकच्या बॉटल घेऊन तोबा गर्दी केली होती. टँकरमध्ये ज्वलनशील पदार्थ असल्याने सतर्कता बाळगत पोलीस प्रशासनाने महत्त्वाची भूमिका बजावली.
 

Web Title: A tanker carrying petrol on the national highway was overturned

टॅग्स :Accidentअपघात