Tamsar-Deewadi Road Trail | तुमसर-देव्हाडी रस्त्याची चाळण
तुमसर-देव्हाडी रस्त्याची चाळण

ठळक मुद्देजीव धोक्यात : दीड महिन्यापासून साधी डागडुजीही नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : देव्हाडी रस्त्यावर ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले असून रस्त्याची अक्षरक्ष: चाळणी झाली असून या रस्तयावरून वाहनधारकांना जीव मुठीत घेवून चालावे लागत आहे. गत दीड महिन्यांपासून खड्डे बुजविण्याचे सौजन्य बांधकाम विभागाने दाखविले नाही.
तुमसर ते देव्हाडी हा डांबरीकरणाचा रस्ता मंजुर आहे. मात्र कामाला अद्याप पावसाळ्यामुळे वेळ आहे. दरम्यान या रस्त्यावर ठिकठिकाणी एक ते दीड फुटाचे खड्डे पडले आहे. एक खड्डा चुकविला की दुसऱ्या खड्ड््यात वाहन जावून उसळले. त्यामुळे दररोज या मार्गावर किरकोळ अपघात होत आहे. दररोज १५ ते २० हजार नागरिक या रस्त्यावरून प्रवास करतात. परंतु खड्डेमय रस्त्यामुळे त्यांना मानसीक त्रास सहन करावा लागत आहे. अधिकारी, लोकप्रतीनिधी या रस्त्यावरून जाणे येणे करतात. परंतु कुणीही या रस्त्याच्या डागडुजीबाबत बोलायला तयार नाही. रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांचा वाहनधारकांनी चांगलाच धसका घेतला आहे. वाहनांचेही या खड्ड्यांमुळे नुकसान होत असल्याचे या रस्त्यावरून प्रवास करणारे वाहन चालक सांगत आहे. आता किमान या रस्त्यावरील खड्डे मुरूम टाकून बुजवावे, अशी मागणी आहे.


Web Title: Tamsar-Deewadi Road Trail
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.