शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

संपामुळे तहसील कार्यालय सुनसान

By admin | Updated: July 3, 2014 23:23 IST

नागपूर विभागातील १६ नायब तहसीलदारांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात यावी, या मागणीसाठी भंडारा जिल्हा तहसीलदार / नायब तहसीलदार संघटनेने बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे.

भंडारा : नागपूर विभागातील १६ नायब तहसीलदारांना सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात यावी, या मागणीसाठी भंडारा जिल्हा तहसीलदार / नायब तहसीलदार संघटनेने बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे. या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी अमित सैनी यांना मागण्यांचे निवेदन दिले.आंदोलनामुळे कामकाज ठप्प पडले असून याचा अनेकांना फटका बसत आहे. सध्या उपविभागीय अधिकारी यांचे पद रिक्त असल्याने तहसील कार्यालयाचा कारभार रामभरोसे आहे.१४ मे २०१२ रोजी नागपूर विभागातील नायब तहसीलदारांना तहसीलदार संवर्गात पदोन्नती देण्याबाबत ५३ नायब तहसीलदारांचे पदोन्नतीचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यापैकी ३७ नायब तहसीलदारांना तहसीलदार म्हणून पदोन्नती देण्यात आली. मात्र उर्वरीत १६ नायब तहसीलदार हे सेवेत ज्येष्ठ असूनही पदोन्नतीपासून वंचित राहिले. या संदर्भात संघटनेने वेळोवेळी नागपूर विभागीय आयुक्तांना निवेदन दिले. मात्र २०१२ पासून विभागीय पदोन्नती समितीची बैठक घेण्यात आली नसल्याचे तहसीलदार संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे संघटनेने सदर बाबीची पूर्तता होईपर्यंत नागपूर विभागातील तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी बेमुदत लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे. तहसीलदार, नायब तहसीलदार कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने कामकाजासाठी आलेल्या अनेकांना आल्यापावली परत जावे लागले. या आंदोलनाचा फटका बसत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. आधीच उपविभागीय अधिकारी कुळमेथे यांच्या स्थानांतरण झाल्यामुळे प्रभारी उपविभागीय अधिकारींचा प्रभार उपजिल्हाधिकारी रविंद्र कुंभारे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. तहसीलदारांचे आंदोलन व उपविभागीय अधिकाऱ्यांचे असलेले पद रिक्त यामुळे तहसील कार्यालयाचा कारभार वाऱ्यावर असल्याचे दिसून आले. (नगर प्रतिनिधी)