माजी सभापतींच्या पतीदेवावर तडिपारीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:43 IST2021-09-16T04:43:32+5:302021-09-16T04:43:32+5:30

विश्वनाथ बांडेबुचे याच्यावर अनेक प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांवर हल्ला करून जखमी केल्याचाही ...

Tadipari's action against the husband of the former speaker | माजी सभापतींच्या पतीदेवावर तडिपारीची कारवाई

माजी सभापतींच्या पतीदेवावर तडिपारीची कारवाई

विश्वनाथ बांडेबुचे याच्यावर अनेक प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांवर हल्ला करून जखमी केल्याचाही गुन्हा नोंद आहे. मोहाडी पोलिसांनी विश्वनाथ बांडेबुचे विरुद्ध तडिपाराचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्याकडे पाठविला होता. त्यावर निर्णय घेऊन तुमसरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी एका वर्षासाठी भंडारा जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश निर्गमित केला. हा आदेश विश्वनाथ बांडेबुचेला १० सप्टेंबर रोजी तामील करण्यात आला. जिल्हा सोडून जाण्यासाठी ४८ तासांची मुदत देण्यात आली होती, ती मुदत मंगळवारी संपली असल्याने बांडेबुचेने मोहाडी येथून आपले बस्तान गुंडाळल्याची माहिती आहे.

भाजपच्या एका माजी आमदारांच्या अगदी जवळचे व विश्वासू अशी विश्वनाथ बांडेबुचे यांची ओळख आहे. मात्र, आता त्यांच्यात बिनसले असून, बांडेबुचेने आता भाजपच्या दुसऱ्या आमदारांची कास धरली. मुंढरी जिल्ह परिषद गटाची उमेदवारीही मागितली होती. कामालासुध्दा लागले होते. परंतु हद्दपारीच्या आदेशाने घात केला.

Web Title: Tadipari's action against the husband of the former speaker