शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात २१ हजार हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:00 IST

भंडारा जिल्हाप्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. अलीकडे सिंचनाच्या सुविधेमुळे दोन हंगामांत धानाची लागवड केली जाते. सर्वाधिक लागवड खरीप हंगामात करण्यात येते. या वर्षीही खरिपात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड झाली होती. मात्र नैसर्गिक प्रकोपाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता. वैनगंगेसह नदी-नाल्यांना आलेला महापूर, अतिवृष्टी आणि किडींच्या प्रादुर्भावाने धानाचे उत्पादन घटले.

ठळक मुद्देनुकसान भरपाईसाठी कसली कंबर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणाचा धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. प्रचंड नुकसान झाले होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी आता शेतकऱ्यांनी कंबर कसली असून जिल्ह्यात २१ हजार हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली आहे. या वर्षी प्रकल्पांमध्ये मुबलक पाणी असल्याने धानाचे उत्पादन चांगले होईल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. भंडारा जिल्हाप्रमुख धान उत्पादक जिल्हा आहे. अलीकडे सिंचनाच्या सुविधेमुळे दोन हंगामांत धानाची लागवड केली जाते. सर्वाधिक लागवड खरीप हंगामात करण्यात येते. या वर्षीही खरिपात मोठ्या प्रमाणात धानाची लागवड झाली होती. मात्र नैसर्गिक प्रकोपाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता. वैनगंगेसह नदी-नाल्यांना आलेला महापूर, अतिवृष्टी आणि किडींच्या प्रादुर्भावाने धानाचे उत्पादन घटले. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. खरिपात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा कंबर कसली. उन्हाळी हंगामात धान लागवडीची तयारी सुरू केली. जिल्ह्यात उन्हाळी धानासाठी २८२० हेक्टरवर पऱ्हे टाकण्यात आले होेते. आतापर्यंत जिल्ह्यात २१ हजार १२२.४० हेक्टरवर उन्हाळी धानाची लागवड आटोपली आहे. यात भंडारा तालुक्यात १४६२ हेक्टर, मोहाडी ६२३ हेक्टर, तुमसर ६०६३ हेक्टर, पवनी २०२६ हेक्टर, साकोली ३८४९ हेक्टर, लाखनी ३०७७ हेक्टर, लाखांदूर ४०५० हेक्टर लागवड करण्यात आली आहे.

वातावरण बदलाचा फ्सतोय फटका  शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाची लागवड केली असून या धानालाही वातवरण बदलाचा फटका बसत आहे. गत आठवड्यात निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणाने खोड कीडीसह करपा रोगाचे आक्रमण झाले आहे. शेतात कीड नियंत्रणासाठी फवारणी करण्यात येत असल्याचे चित्र दिसत आहे. उन्हाळी हंगामतरी साधावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

 

टॅग्स :agricultureशेती