बटाटा लागवडीचा यशस्वी प्रयोग

By Admin | Updated: January 11, 2015 22:46 IST2015-01-11T22:46:12+5:302015-01-11T22:46:12+5:30

कृषी विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) साकोली यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील एकूण २३ शेतकऱ्यांनी २७ एकर क्षेत्रावर बटाटा लागवड केलेली आहे.

Successful use of potato cultivation | बटाटा लागवडीचा यशस्वी प्रयोग

बटाटा लागवडीचा यशस्वी प्रयोग

साकोली तालुक्यातील प्रयोग : २३ शेतकऱ्यांनी केली लागवड
साकोली : कृषी विभाग व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) साकोली यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील एकूण २३ शेतकऱ्यांनी २७ एकर क्षेत्रावर बटाटा लागवड केलेली आहे. भंडारा जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बि. चलवदे यांनी साकोली तालुक्यातील वडद या गावी राजेश कापगते यांनी लागवड केलेल्या बटाटा क्षेत्राची पाहणी केली.
राजेश कापगते व तालुक्यातील २२ शेतकऱ्यांनी कृषि विभागामार्फत क्षेत्रीय भेटीचा कार्यक्रम आयोजित करून तुमसर तालुक्यातील बघेडा या गावी जावून बटाटा लागवडी बाबत माहिती समजून घेतली. बटाटा पिकाविषयी सर्व तांत्रिक व शास्त्रीय माहितीचा अभ्यास करून लागवड केली. राजेश कापगते यांनी कुफ्रिचिप्सोना-३ व कुफ्रि बहार या वानाची निवड करून बटाटा पिकासाठी पाणी व खत व्यवस्थापन ठिंबक सिंचन पद्धतीने केले. सध्या बटाटा पीक के वाढीच्या अवस्थेत असून जमिनीखालील बटाट्याची वाढ चांगली आहे.
आज घडीला बटाटा पीक दोन महिन्याचे असून साधारणत: १५ फेब्रुवारीपर्यंत बटाटा काढनिस तयार होईल. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बी. चलवदे यांनी बटाटा पिकाची पाहणी करत असताना रोग व किडिंबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. सदर पिकाची पाहणी केल्यानंतर आर.बी. चलवदे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. तसेच कृषि विप्सेनाऱ्या या वानाला चिप्स करिता मार्केट मध्ये खूप मागणी असल्यामुळे यापुढे या रानाची जास्तीत जास्त लागवड साकोली तालुक्यात झाली पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. बटाटा लागवडीकरिता आवश्यक ते मार्गदर्शन व प्रशिक्षण करिता तालुका कृषि अधिकारी साकोली यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आर.बि. चलबुदे, उपविभागीय कृषि अधिकारी एस.के. सांगडे, तालुका कृषि अधिकारी जी.के. चौधरी व तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) व्ही.एस. पारीते हे उपस्थित होते. बटाटा लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना पर्यवेक्षक आर.ए. खोब्रागडे व सहायक एस.सी. चव्हाण यांनी मार्गदर्शन केले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Successful use of potato cultivation