शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

संघटनांचे तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 06:00 IST

गत काही वर्षापासून शिक्षण क्षेत्रातील प्रश्न अधिक गंभीर बनत चालले आहे. शालेय, महाविद्यालयीन शिक्षणाचे खासगीकरण होऊन तेथे पैशांचा बाजार मांडला जातोय. जेएनयू सारख्या प्रगत व दर्जेदार विद्यापीठामध्ये भरमसाठ शुल्कवाढ केली जातेय. तेथे विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष हिंसाचार केला जातोय. अंध अपंग उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना तुरुगात डांबले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शिक्षणाचे खासगीकरण, बाजारीकरण, विद्यापीठातील भरमसाठ शुल्कवाढ तसेच विद्यार्थ्यांच्या संस्थात्मक धोरणांच्या निषेधार्थ तुमसर शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक संघटनांच्या वतीने उत्स्फूर्तपणे आंदोलन करण्यात आले. समता सैनिक दल, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम आणि सजग नागरिक मंच या संघटनांनी तहसीलदांरामार्फत राष्ट्रपती व मानव संसाधन व विकास मंत्रालयाला निवेदन दिले.गत काही वर्षापासून शिक्षण क्षेत्रातील प्रश्न अधिक गंभीर बनत चालले आहे. शालेय, महाविद्यालयीन शिक्षणाचे खासगीकरण होऊन तेथे पैशांचा बाजार मांडला जातोय. जेएनयू सारख्या प्रगत व दर्जेदार विद्यापीठामध्ये भरमसाठ शुल्कवाढ केली जातेय. तेथे विरोध करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष हिंसाचार केला जातोय. अंध अपंग उच्चशिक्षित विद्यार्थ्यांना तुरुगात डांबले जात आहे. अशा परिस्थितीत आयआयटी मद्रास येथील फातीमा लतीफ सारख्या अनेक विद्यार्थ्यांचे संस्थात्मक बळी घेतले जात आहेत. या सर्व घटनांमागे राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) कारणीभूत आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या सर्व परिस्थितीवर उपाय म्हणून शिक्षणाचे खासगीकरण त्वरीत बंद करून शिक्षणाचे राष्ट्रीयीकरण करण्यात यावे, सर्वांना समान, मोफत, दर्जेदार शिक्षण सरकारद्वारे पुरविण्यात यावे, शिक्षणावरील सरकारच्या खर्चात वाढ करण्यात यावी, आपल्या हक्कांसाठी लोकशाही पद्धतीने लढणाºया विद्यार्थ्यांवरील कारवाई मागे घेण्यात यावी, सर्व प्रकारची शुल्कवाढ रद्द करून सरकारने विनामुल्य शिक्षणाची व्यवस्था करावी, नवे राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करून त्या जागी समतामूलक शिक्षण धोरण त्वरीत राबवावे अशा अनेक मागण्या निवेदनात नमूद आहेत.या आंदोलनादरम्यान जय डोंगरे, गणेश बर्वे, सुलभा हटवार, डॉ. प्रिदर्शना शहारे, मीरा भट, डॉ.सुनील चवळे, राहुल डोंगरे व राजेश देशमुख यांनी मार्गदर्शन केले. या आंदोलनातील सर्वांनीच शिक्षणाला मूलभूत अधिकाराचा दर्जा मिळून फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांप्रमाणे शिक्षण क्षेत्रात परिवर्तन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच गरज पडल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक तीव्र करावे लागेल, असा इशाराही दिला. मागण्यांचे निवेदन तुमसरचे तहसीलदार गजेंद्र बालपांडे यांच्याकडे सोपविण्यात आले.या आंदोलनाला तुमसरातील विद्यार्थी, पालक व सुज्ञ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Tahasildarतहसीलदार