‘त्या’ विद्यार्थिनीची विद्यापीठाकडे तक्रार

By Admin | Updated: April 27, 2017 00:26 IST2017-04-27T00:26:46+5:302017-04-27T00:26:46+5:30

बी.एस.सी. प्रथम वर्ष द्वितीय सेमीस्टरची परीक्षार्थी दुर्गा गायधने या विद्यार्थिनीजवळ तपासाअंती कॉपी आढळून आली.

The student of 'that' student complaint | ‘त्या’ विद्यार्थिनीची विद्यापीठाकडे तक्रार

‘त्या’ विद्यार्थिनीची विद्यापीठाकडे तक्रार

प्रकरण परीक्षा केंद्रावरचे : प्रश्नपत्रिका पळविली
तुमसर : बी.एस.सी. प्रथम वर्ष द्वितीय सेमीस्टरची परीक्षार्थी दुर्गा गायधने या विद्यार्थिनीजवळ तपासाअंती कॉपी आढळून आली. कारवाई टाळण्याकरिता तिने प्रश्नपत्रिका घेऊन परीक्षागृहातून धूम ठोकली. पळून जाताना तपासणीस महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की केली. यासंदर्भात पोलीस अधीक्षक, नागपूर विद्यापीठाकडे तक्रार करण्यात आली आहे.
एस.एन. मोर महाविद्यालयाची नियमित विद्यार्थिनी दुर्गा जसवंत गायधने हिचा २० एप्रिल रोजी बी.एस.सी. प्रथम वर्ष (बॉटनी) सेकंड सेमीस्टरचा पेपर साई महाविद्यालय परीक्षा केंद्रावर होता. कॉपी तपासतांनी दुर्गा गायधने हिच्याकडे कॉपी आढळली. तेव्हा तिने तपासणीस महिला अधिकाऱ्याला धक्काबुक्की करून परीक्षागृहातून प्रश्नपत्रिका घेऊन धुम ठोकली. तिचा युएफ-१६ क्रमांकाचा फॉर्म भरून घेतला. दि. २२ एप्रिल रोजी सुद्धा दुर्गा गायधनी ही प्रश्नपत्रिका घेऊन पळत होती. तेव्हा येथील कर्मचाऱ्याने तिचा पाठलाग करून प्रश्नपत्रिका हिसकावून घेतली.
परीक्षा केंद्राबाहेर पर्यवेक्षक नलिनी बोरकर यांनी दुर्गा गायधने हिची तपासणी केली असता तिने धक्काबुक्की केली व पळून गेली. संबंधित परिक्षार्थीवर निर्बंध लावण्याचे पत्रही विद्यापीठ परीक्षा विभागाकडे करण्यात आली आहे. (तालुका प्रतिनिधी)

दुर्गा गायधने या परीक्षार्थीचे आरोप निराधार आहेत. परीक्षागृहातून ती प्रश्नपत्रिका घेऊन पळाली होती. तिला कुणी हाकलले नाही. तपासात तिच्याजवळ कॉपी आढळली. तसे तिने स्टेटमेंटवर स्वाक्षरी केली आहे. विद्यापीठ नियमानुसारच परीक्षा केंद्र संचालक व सहसंचालकांची नियुक्ती होते. विद्यापीठ नियमानुसार संबंधित विद्यार्थिनीवर कारवाई करण्यात आली आहे.
- देवेंद्रकुमार रंभाड, मुख्य पर्यवेक्षक, परीक्षा विभाग, नागपूर विद्यापीठ.

Web Title: The student of 'that' student complaint