भंडारा शहरातील रस्त्यांवर झाली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:00 IST2020-05-05T05:00:00+5:302020-05-05T05:00:59+5:30

लॉकडाऊन ३ मे रोजी संपण्यापुर्वीच केंद्र शासनाने १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली होती. मात्र ३ मे नंतर राज्य शासन पुर्ववतपणे उद्योगधंद्यासह अन्य बाबींसाठी अटी शिथिल करेल याची व्यापारी वाट बघत होते. याचदरम्यान राज्य शासनाने ग्रीन, ऑरेंज व रेड झोनसाठी काही सवलती जाहीर केल्या.

The streets of Bhandara were crowded | भंडारा शहरातील रस्त्यांवर झाली गर्दी

भंडारा शहरातील रस्त्यांवर झाली गर्दी

ठळक मुद्देदुकानदार संभ्रमात : आदेशापूर्वीच उघडली दुकाने

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य शासनाने ऑरेंज झोनसाठी काही अंशी सवलत जाहीर केल्यानंतर त्याचा परिणाम भंडारा जिल्ह्यातही दिसून आला. विशेषत: भंडारा शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने जिल्हा प्रशासनाच्या आदेशापुर्वीच उघडण्यात आली. त्यामुळे रस्त्यांवर गर्दी दिसून येत होती.
दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन ३ मे रोजी संपण्यापुर्वीच केंद्र शासनाने १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्याची घोषणा केली होती. मात्र ३ मे नंतर राज्य शासन पुर्ववतपणे उद्योगधंद्यासह अन्य बाबींसाठी अटी शिथिल करेल याची व्यापारी वाट बघत होते. याचदरम्यान राज्य शासनाने ग्रीन, ऑरेंज व रेड झोनसाठी काही सवलती जाहीर केल्या. ऑरेंज झोनअंतर्गत सवलत जाहीर करताच नागरिकांसह व्यापाऱ्यांनी तसा अर्थ काढून सोमवारी सकाळीच दुकाने उघडायला सुरूवात केली. भंडारा शहरातून गांधी चौक ते बसस्थानक मार्गावरील मुख्य बाजारपेठ, मोठा बाजार, राजीव गांधी चौक यासह शहरातील विविध भागातील दुकाने उघडण्यात आली होती. नागरिकही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी करुन होते. मात्र जिल्हा तोपर्यंत प्रशासनातर्फे कुठलाही आदेश काढण्यात आला नव्हता. दुपारी १२ वाजतानंतर जिल्हा प्रशासनाने व्यापारी प्रतीष्ठानासह यापुर्वी संदर्भीय आदेशानुसार कोणती आस्थापने सुरू राहतील यासंबंधी आदेश काढले. परिणामी दुपारनंतर जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार पोलिसांनी शहरात फिरून व्यापारी प्रतिष्ठाने बंद केली. संभ्रमावस्थेत असलेल्या व्यापाऱ्यांनीही दुकाने बंद केली. भंडारा शहरासारखीच अवस्था जिल्ह्याच्या ग्रामीण व नगर पंचायत क्षेत्रातही दिसून आली. अनेकांनी दुपारनंतर दुकाने बंद केली.

आवश्यक व अत्यावश्यक सेवा सुरू
जिल्हाधिकाºयांनी सोमवारी सुधारित आदेश निर्गमित करून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा व जीवनावश्यक वस्तुंची दुकाने सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले. शॉपिंग केले. शॉपिंग कॉम्प्लेक्स मात्र बंद राहणार आहेत. निवासी इमारती व नागरी कॉलनीतील स्वतंत्र दुकाने सुरू राहतील. त्यात अत्यावश्यक सेवा व इतर सेवा देणाºया दुकानांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील सर्व दुकाने अटी व शर्तीचे पालन करून सुरू राहणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे. भंडारा तालुक्यातील कंटेनमेंट व बफर झोनमधील गावे व क्षेत्र वगळून ही परवानगी राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच १९ एप्रिल रोजी जारी केलेल्या आदेशानुसार सर्व आस्थापना, उपक्रम आदेशातील कार्यपद्धतीने सुरू राहतील, असेही या आदेशात म्हटले आहे.

Web Title: The streets of Bhandara were crowded