शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीत स्थायी करा, अन्यथा कामबंद

By admin | Updated: May 9, 2017 00:21 IST

तिन्ही वीज कंपन्यांमधील कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनुभवानुसार व ज्येष्ठतेनुसार नोकरीत कायमरित्या सामावून घ्यावे, ....

२२ पासून राज्यव्यापी आंदोलन : स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्क्स फेडरेशनची निदर्शने लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : तिन्ही वीज कंपन्यांमधील कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनुभवानुसार व ज्येष्ठतेनुसार नोकरीत कायमरित्या सामावून घ्यावे, या मागणीला घेवून महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीसिटी वर्क्स फेडरेशनने सोमवारी राज्यव्यापी धरणे दिले. शहरातील महावितरण कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शने करित कंपनीच्या कर्मचारी विरोधी नितीचा विरोध केला. शासनाच्या अधिकार क्षेत्रातील तिन्ही वीज कंपन्यांमधील (महावितरण, महावीजनिर्मिती व महापारेषण) कंत्राटी स्वरुपात कर्मचारी मागील पाच ते पंधरा वर्षांपासून कार्य करीत आहेत. जवळपास ३२ हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना वीज कंपनीने अजूनही कायमस्वरुपी नोकरीत सामावून घेतले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार समान काम समान वेतनाच्या धोरणाची अंमलबजावणी तथा सेवा ज्येष्ठता यादी तयार करुन रोजंदारी कामगार योजना लागू करा या मागणीला घेवून वीज कंपनीचे कंत्राटी कामगार मागण्यांची पूर्तता न झाल्यास २२ मे पासून राज्यव्यापी काम बंद आंदोलन पुकारणार आहे. विद्युत भवनाच्या प्रवेशद्वारावर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी निदर्शने व द्वार सभा घेतली. या सभेत वीज कंपनीसोबत मागील चार वर्षांपासून वाटाघाटी सुरु असले तरी त्यापासून कुठलाही तोडगा निघाला नाही. वर्क्स फेडरेशनने १ सप्टेंबर २०१५ ते २८ सप्टेंबर २०१५ असा २८ दिवसांचा संप केला होता. सोमवारी झालेल्या द्वारसभेत फेडरेशनचे तथा कंत्राटी कामगार गणेश तिरपुडे, कैलास जांभुळकर, संदीप बोरपुरे, तुलसीदास कोरे, देवेंद्र कावळे, उमेश आगलावे, डिलेश्वर चोपकर, पवन वैद्य, पगार हटवार, राजकुमार तितीरमारे, नितीन निमजे, टेकराम झोडे, सुनिल डुंभरे, संदीप देशमुख, अमित मेश्राम, सौरभ सांगोळे, आशिष शेंडे, गुरुधर क्षिरसागर, दिपक बोंद्रे, मुकेश कापगते, पंकज लाडेकर, सिमा सीरसाम, विद्या कोचे, माया मडावी, छाया निखाडे, लक्ष्मण नंदनकर, धनंजय ढवळे, तेजू मुंगूलमारे, सुभाष कोल्हारे, आर. एम जांगळे, जागेश्वर डोंगरवार, विजयकुमार वालदे, मनोज पारधी, राकेश टेंभुर्णे आदी उपस्थित होते.