पालांदुर जिल्हा परिषद क्षेत्राच्या समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:41 IST2021-02-05T08:41:22+5:302021-02-05T08:41:22+5:30

जयंत पाटील यांना निवेदन : सुधन्वा चेटुले यांचा पुढाकार खराशी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सुरू असलेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद ...

Solve the problems of Palandur Zilla Parishad area | पालांदुर जिल्हा परिषद क्षेत्राच्या समस्या सोडवा

पालांदुर जिल्हा परिषद क्षेत्राच्या समस्या सोडवा

जयंत पाटील यांना निवेदन : सुधन्वा चेटुले यांचा पुढाकार

खराशी : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सुरू असलेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा उपक्रमा प्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी साकोली विधानसभा क्षेत्राचा आढावा घेतला. यादरम्यान खराशीचे उपसरपंच तथा राकाँचे कार्यकर्ते सुधन्वा चेटुले यांनी पाटील यांची भेट घेत पालांदुर जि. प. क्षेत्रातील समस्या सोडविण्याबाबत चर्चा करीत मागण्यांचे निवेदन दिले.

यात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, धान खरेदी केंद्राचे प्रश्न सोडविणे, ग्रामपंचायतीच्या समस्या, आरोग्य व्यवस्था, शिक्षण क्षेत्रांत आवश्यक सुविधा, घरकूल योजनेचा असमतोल, चुलबंद नदी खोऱ्याचा विकास याबाबा सविस्तर चर्चा करून निवेदन दिले.

ना. पाटील यांनी सर्व समस्या लक्षात घेऊन संबंधित विभागाशी चर्चा करून प्रश्न सोडविण्याचे आस्वासन याप्रसंगी दिले. सुधन्वा चेटुले यांनी पक्षवाढीबाबत नवीन उपक्रमांची माहिती दिली. चेटुले यांनी भेटीचे श्रेय माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, धनंजय दलाल यांना दिले.

कॅप्शन : जयंत पाटील यांच्याशी चर्चा करताना सुधन्वा चेटुले.

Web Title: Solve the problems of Palandur Zilla Parishad area