सोहम मानकर खूनप्रकरणी लाखांदूर तहसीलवर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2019 06:00 AM2019-12-05T06:00:00+5:302019-12-05T06:00:38+5:30

सोहम गजानन मानकर (१६) रा. कुडेगाव याचा ४ नोव्हेंबर रोजी खून करण्यात आला होता. हा खून गळा आवळून केल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले. त्यानुसार लाखांदूर पोलीसांनी खूनाच्या गुन्ह्याची नोंद करत आरोपींना ताब्यात देखील घेतले. मात्र आरोपींकरवी पोलीस प्रशासनासह जनसामान्यांची पोलीस कोठडीत असतांना देखील दिशाभूल होणे संशयास्पद ठरल्याने याप्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश असावा, असा संशय बळावला आहे.

Soham Mankar marches on Lakhandur tehsil for murder | सोहम मानकर खूनप्रकरणी लाखांदूर तहसीलवर मोर्चा

सोहम मानकर खूनप्रकरणी लाखांदूर तहसीलवर मोर्चा

Next
ठळक मुद्देआरोपींचा शोध घ्या : संघर्ष वाहिनी समितीचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : कबड्डी पाहवयास गेलेल्या एका १६ वर्षीय विद्यार्थ्याचा गळा आवळून खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालानंतर पोलीस प्रशासनाला निष्पन्न झाल्याने दोघांना अटकही झाली. मात्र या खून प्रकरणात आणखी काही लोकांचा सहभाग असावा, या संशयावरुन गावकऱ्यांत चर्चा असली तरी या प्रकरणी योग्यरित्या न्याय मिळावा, यासाठी संघर्ष वाहिनी समितीने मंगळवारी लाखांदूर तहसील कार्यलयावर मोर्चा काढण्यात आला. शिष्टमंडळाने तहसीलदारांशी चर्चा करुन निवेदन सोपविले.
सोहम गजानन मानकर (१६) रा. कुडेगाव याचा ४ नोव्हेंबर रोजी खून करण्यात आला होता. हा खून गळा आवळून केल्याचे शवविच्छेदन अहवालात निष्पन्न झाले. त्यानुसार लाखांदूर पोलीसांनी खूनाच्या गुन्ह्याची नोंद करत आरोपींना ताब्यात देखील घेतले. मात्र आरोपींकरवी पोलीस प्रशासनासह जनसामान्यांची पोलीस कोठडीत असतांना देखील दिशाभूल होणे संशयास्पद ठरल्याने याप्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश असावा, असा संशय बळावला आहे.
दरम्यान, पोलीस कोठडीतील आरोपीचे एका अल्पवयीन आरोपीने फसविल्याचे आरोप ऐकताना नेमका या घटनेतील आरोपी कोण हे समजणे सर्वत्र कठीणप्राय झाले आहे. या सबंध प्रकरणाचा छडा पोलीस प्रशासनाने लावावा, या हेतुने संघर्ष वाहिनी समीती अंतर्गत भव्य मोर्चा लाखांदूर येथील तहसील कार्यालयावर काढण्यात आला होता.
यावेळी संघर्ष वाहिनी समितीतर्फे लाखांदूर तहसीलदारांना निवेदीत करुन मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्याची आग्रही मागणी देखील करण्यात आली.
या मोर्चाचे नेतृत्व समितीचे संयोजक दिनानाथ वाघमारे, सेवानिवृत्त न्यायाधीश चंद्रलाल मेश्राम, हरिश्चंद्र शहारे, अशोक शेंडे, डी. डी. वलथरे , डी.एम. मानकर यासह शेकडो ढिवर, भोई समाज महिला-पुरुष नागरीकांसह गावातील नागरिक उपस्थित होते. आता या प्रकरणी पोलीस प्रशासन कोणती कारवाई करतात, याकडे लक्ष आहे.

Web Title: Soham Mankar marches on Lakhandur tehsil for murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Murderखून