शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

भगिनी निवेदिता महिला वसतीगृह कुणासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 00:31 IST

लाखनीनगरातील ग्रामीण क्षेत्रातील गरीब होतकरू विद्यार्थींना मुक्कामाने राहून उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी वसतीगृहाची स्थापना करण्यात आली,...

लाखनीतील प्रकार : युजीसी निधीची चौकशीची मागणीलाखनी : लाखनीनगरातील ग्रामीण क्षेत्रातील गरीब होतकरू विद्यार्थींना मुक्कामाने राहून उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी वसतीगृहाची स्थापना करण्यात आली, परंतु महाविद्यालयाच्या मूळ उद्देशापासून प्राचार्य यांनी वसतिगृहाची इमारत महाविद्यालय आणि कार्यक्रम घेण्याकरिता वापरत आहेत. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निधीचा गैरवापर करताना प्रकर्षास येत आहे. याबाबद चौकशी व्हावी, अशी मागणी महाविद्यालयातील आजी माजी विद्यार्थी तसेच नागरिकांनी केली आहे.समर्थ महाविद्यालय, लाखनी येथील प्राचार्य यांना राष्ट्रीय शिक्षण संस्थेने निलंबित केले आहे, हे प्रकरण तव्यावर असतांना समर्थ महाविद्यालयात उभे असलेले 'भगिनी निवेदिता महिला वसतिगृह' या वस्तीगृहाचे उद्घाटन ७ जानेवारी २०१३ ला अनेक महानुभाव पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. या वस्तीगृहासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या १० व्या आयोगाकडून ८० लाख रुपये मिळाले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निधीतून दुमजली इमारत समर्थ महाविद्यालय लाखनी येथे मोठ्या दिमाखात उभी आहे. परंतु तीन वर्षे लोटली तरीपण 'भगिनी निवेदिता महिला वसतिगृह' मध्ये विद्यार्थिनींना राहण्यास प्रवेश दिला गेला नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या ८० लाख रुपये निधी खर्च करून बांधल्या गेलेली इमारत आता वर्ग खोली, समारंभ, आणि लग्न-रिसेप्शनसाठी किरायाने दिली जात आहे. महाविद्यालयातील दिवसांमध्ये सभागृह किरायाने दिला जातो, त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्याथ्यार्नी अनेकदा प्राचार्यांना तोंडी सूचना केल्या तरीही काहीही तोडगा काढण्यात आला नाही. युजीसीच्या अनुदानातून तयार झालेल्या वस्ताीगृहाचे व्यवसायिकीकरण होत आहे. दर शनिवारी आणि रविवारला वसतिगृहाची इमारत बुक असते, ही शोकांतिका आहे. (शहर प्रतिनिधी)