शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

वाकाटक काळाची साक्ष देताहेत ‘शिलाप्रकस्थ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2016 00:42 IST

वाकाटक राजेशाहीची, संस्कृतीची ओळख करुन देणारे शिला प्रकस्थ डालमेंट्स पवनी तालुक्यातील खैरी (तेलोना) पिंपळगाव (नि) येथे आहेत.

पवनी : वाकाटक राजेशाहीची, संस्कृतीची ओळख करुन देणारे शिला प्रकस्थ डालमेंट्स पवनी तालुक्यातील खैरी (तेलोना) पिंपळगाव (नि) येथे आहेत. अशाच प्रकारचे शिलाप्रकस्थ तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पाहून गावाजवळील जंगलातील मानसरा तलावाजवळ आहे. अनेक शतकापुर्वीच हे प्राचीन ऐतिहासिक शिलाप्रकस्थ उन्ह पाऊस, वारा, वादळ यांचा सामना करीत वाकाटक काळाची साक्ष देत आजही उभे आहेत. या प्राचीन शिलाप्रकस्थांचे संरक्षण करण्याची गरज आहे.ऐतिहासिक, प्राचीन पवनी नगरात आजही खोदकामात प्राचीन वस्तू मिळतात. अनेक शतकाच्या पुर्वी पवनी हे बौध्द धर्माच्या प्रसाराचे केंद्र होते. सम्राट अशोकाच्या काळात पवनी नगराला फार महत्व होते. १९६८-७० मध्ये पुरातत्व विभाग व नागपुर विद्यापिठाने डॉ. मिराशी व डॉ. देव यांच्या मार्गदर्शनाखाली जगन्नाथ टेकडीच्याखाली केलेल्या खोदकामात भारतातील सर्वात मोठा प्राचीन बौध्दस्तूप आढळून आला आहे. या स्तुपाचे अवशेष आजही मुंबई, दिल्लीच्या वस्तू संग्रहालयात ठेवले आहेत. सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा ही पवनी मार्गे बौध्दधर्माचा प्रसार करण्याकरिता दक्षीणत गेल्याचा इतिहासात उल्लेख आढळतो.इ.स. सातव्या शतकात गुण्त वंशाचे राज्य भारतात होते. त्यांची राजधानी पाटलीपुत्र होती. या गुण्तवंशात समुद्रगुण्त, चंद्रगुण्त, विक्रमादित्य आदी सम्राट होवून गेले. त्यावेळेस विदर्भात वाकाटक राजाचे राज्य होते. वाकाटक पराक्रमी असल्यामुळे गुण्तांनी नातेसंबंध जोडले होते. वाकाटकाच्या काळात त्यांच्या साम्राज्यांची ओळख व्हावी याकरिता गावा-गावात शिलाप्रकस्थ डालमेट्स स्थापित केले होते. हे शिलाप्रकस्थ वाकाटकाच्या स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहेत. चुलीच्या आकाराचे तीन दगड ठेवून त्यावर एक मोठा भव्य सपाट दगड ठेवला आहे. या शिलाप्रकस्थांना स्थानिक लोक तेलगोटा म्हणतात. याची पुजाही करतात. हे शिलाप्रकस्थ खैरी (तेलीता), पिंपळगाव(नि.) येथे आहेत. पण अश्याच प्रकारचे एक शिलाप्रकस्थ पवनी पासुन ७ किमी अंतरावरील पाहुनगाव जवळील जंगलातील भानसारा तलावाजवळ आहे. या जंगलाचा समावेश उमरेड-करांडला अभयारण्यात करण्यात आल्यामुळे येथे जाण्याला बंदी आहे. हे तिन्ही शिलाप्रकस्थ डालमेंट्स खुल्या जागेत उन्ह, पाऊस, वादळ, वारा याचा सामना करीत वाकाटक साम्राज्याची ओळख व प्रसिध्दी करुन दिल्यास तालुक्यात झपाट्याने वाढत असलेल्या पर्यटन क्षेत्रात अजून भर पडणार आहे. व शिलाप्रकस्थ असलेले स्थळे पर्यटनस्थळाच्या यादीत यावयास वेळ लागणार नाही. (शहर प्रतिनिधी)