शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

मतदानासाठी सात हजार 406 कर्मचारी नियुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 05:00 IST

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची पहिल्या टप्प्यातील निवडणूक २१ डिसेंबर राेजी हाेत आहे.  ३९ गट आणि ७९ गणात ही निवडणूक हाेत असून जिल्हा परिषदेसाठी २४५ तर पंचायत समितीसाठी ४१७ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात १३२२ मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी सात हजार ४०६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीसाठी प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली असून मतदानासाठी सात हजार ४०६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात दहा संवेदनशील, दाेन अतिसंवेदनशील, १७ नक्षलप्रभावित मतदान केंद्र असल्याची माहिती जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी येथे पत्रपरिषदेत दिली.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची पहिल्या टप्प्यातील निवडणूक २१ डिसेंबर राेजी हाेत आहे.  ३९ गट आणि ७९ गणात ही निवडणूक हाेत असून जिल्हा परिषदेसाठी २४५ तर पंचायत समितीसाठी ४१७ उमेदवार रिंगणात आहेत. जिल्ह्यात १३२२ मतदान केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. त्यासाठी सात हजार ४०६ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. त्यामध्ये १३१ क्षेत्रीय अधिकारी, १४५५ मतदान केंद्राध्यक्ष आणि ४३६५ मतदान अधिकाऱ्यांचा समावेश असून सुरक्षेसाठी १४५५ पाेलीस तैनात करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.जिल्ह्यात तुमसर तालुक्यात दाेन आणि लाखांदूर तालुक्यात आठ असे दहा संवेदनशील तर लाखांदूर तालुक्यात दाेन अतिसंवेदनशील आणि १७ नक्षलप्रभावी मतदान केंद्र आहेत. निवडणूकीसाठी कर्मचाऱ्यांचे दाेन प्रशिक्षण पुर्ण झाले असून शांततेत आणि निर्भय वातावरणात मतदान करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त- निवडणुकीच्या काळात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाेलिसांचा तगडा बंदाेबस्त राहणार आहे. पाेलीस अधिक्षक व अपर पाेलीस अधिक्षकांच्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यात आठ डीवायएसपी, २३ पाेलीस निरीक्षक, १४७ सहायक पाेलीस निरीक्षक, १८७० पुरुष पाेलीस कर्मचारी, ७०० हाेमगार्ड, एसआरपीएफच्या तीन प्लाटूनचा समावेश आहे.२८ हजार लीटर दारु जप्त- निवडणूक आचारसंहितेच्या काळात राज्य उत्पादन शुल्क विभागाने राबविलेल्या माेहिमेत २७ हजार ९४० लीटर दारुसाठा जप्त केला आहे. बारा लाख १५ हजार ७१४ रुपयांची ही दारु असून याप्रकरणी ७७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूक