शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जिल्ह्यात आढळले सात कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 5:00 AM

जिल्ह्यातून नागपूर येथे तपासणीसाठी आतापर्यंत २०३९ लोकांचे घशाचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यापैकी १९६२ अहवाल निगेटिव्ह आले असून ३८ जणांचे नमूने पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत १३९ अहवाल अप्राप्त आहेत. १५ मे रोजी मुंबई येथून आलेली २४ वर्षीय व्यक्ती, १७ व १८ मे रोजी पुण्याहून आलेले चार तर सोलापूर जिल्ह्यातून दोन व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले.

ठळक मुद्देसंख्या पोहचली ३८ वर : सर्वाधिक रुग्ण साकोली तालुक्यातील

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सोमवारी जिल्ह्यात एकही कोरोनाबाधीत रुग्ण आढळला नव्हता. दरम्यान मंगळवारी नागपूरहून आलेल्या अहवालात सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३८ झाली आहे. यापैकी अ‍ॅक्टीव रुग्णांची संख्या २९ आहे.जिल्ह्यातून नागपूर येथे तपासणीसाठी आतापर्यंत २०३९ लोकांचे घशाचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यापैकी १९६२ अहवाल निगेटिव्ह आले असून ३८ जणांचे नमूने पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत १३९ अहवाल अप्राप्त आहेत. १५ मे रोजी मुंबई येथून आलेली २४ वर्षीय व्यक्ती, १७ व १८ मे रोजी पुण्याहून आलेले चार तर सोलापूर जिल्ह्यातून दोन व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले. या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून हे सर्व साकोली तालुक्यात आले होते. ३० मे रोजी यांच्या घशाचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. दरम्यान मंगळवारी या सर्वांचे नमुने पॉझिटिव्ह आहेत.आयसोलेशन वॉर्डात २९ व्यक्ती भरती असून आतापर्यंत ३२६ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहेण साकोली, तुमसर, लाखांदूर, पवनी, लाखनी, भंडारा व मोहाडी तालुक्यातील कोवीड केअर सेंटरमध्ये ५५४ व्यक्ती भरती आहेत. आतापर्यंत ११८३ व्यक्तींना हॉस्पीटल क्वारंटाईनमधून सुटी देण्यात आली आहे.जिल्ह्यात आले ३९ हजार ७५२ व्यक्तीपुणे, मुंबई व इतर राज्यातून जिल्ह्यात ३९ हजार ७५२ व्यक्ती आले आहेत. यापैकी २७ हजार १६८ व्यक्तींचा २८ दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झालेला आहे. तसेच १२ हजार ५८४ व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून बाहेर निघण्यास मनाई करण्यात आली आहे. तीव्र श्वासदाह असलेले १४८ व्यक्तींना भरती करण्यात आले असून १४७ व्यक्तींच्या घशातील नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी १४६ नमुने निगेटिव्ह आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या